शाहूवाडीतील मान येथे गॅस टँकर पलटी झाल्याने गावकऱ्यांच्या भीतीच वातावरण.

शाहूवाडीतील मान येथे गॅस टँकर पलटी झाल्याने गावकऱ्यांच्या भीतीच वातावरण.


-------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शाहूवाडी तालुक्यातील, मान गावानजीक आज पहाटे रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने येणारा गॅसचा टँकर अपघातात पलटी झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. अपघात ठिकाणी शाहूवाडी पोलीस आणि तहसीलदार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत. गॅसने भरलेला टँकर पलटी झाल्याने या अपघात स्थळापासून दोन किलोमीटर परिघातील गावकऱ्यांना प्रशासनाने अन्यत्र हलवले आहे. रत्नागिरीहून अपघातग्रस्त टँकर मधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यासाठी मागवला आहे. या ठिकाणी अपघातग्रस्त टँकर मधील गॅस प्रज्वलित होऊ नये यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त नेमला आहे. अपघात ग्रस्त टँकर मधील मृताची ओळख अजून पटलेली नाही. संबंधिताचा मृतदेह शाहूवाडी आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला आहे. या अपघाताची संबंधित टँकर मालक आणि रत्नागिरीतील गॅस एजन्सी यांच्या अधिकाऱ्यांना शाहूवाडी पोलिसांनी अपघात स्थळी बोलवलं आहे. काही वेळातच  संबंधित लोक कोल्हापूर मध्ये आल्या नंतर अपघाताचे नक्की कारण स्पष्ट होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र या अपघाताने शाहुवाडीतील मान गावामध्ये तणावाची स्थिती आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.