एकाच दिवशी ७५००० लाभार्थ्यांना लाभ देणार_- रूचेश जयवंशी- पुढील महिन्यात शासकीय योजनांची जत्रा.
एकाच दिवशी ७५००० लाभार्थ्यांना लाभ देणार_- रूचेश जयवंशी- पुढील महिन्यात शासकीय योजनांची जत्रा.
----------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------
शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना एकाच दिवशी किमान ७५००० हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शासकीय योजनांच्या जत्रेचा कार्यक्रम जिल्ह्यात होणार असल्याची माहिती आज सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी यांनी याबाबत सर्व संबंधित विभागाने करावयाच्या कार्यवाही बाबतसुचना दिल्या.यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, शासकीय योजना सर्वसामान्यांसाठी पोहचवण्यासाठी हा उपक्रम आहे.यामधये कुरुषि , महिला व बालविकास,गारमीण विकास यंत्रणा, आरोग्य, रोजगार, जिल्हा उद्योग केंद्र यासह विविध महामंडळाचे योजनेच्या प्रामुख्याने समावेश आहे.या विभागांनी त्यांच्या पात्र लाभार्थ्यांना योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये आपण पोचलो पाहिजे, एखादा लाभार्थी जर अनेक विभागांत मिळणाऱ्या योजनेसाठी पात्र ठरत असेल तर त्यास त्या योजनेचा लाभ दिला पाहिजे. एकाच दिवशी पात्र लाभार्थ्यांना योजना मंजुरीची पत्रे देण्यात येणार आहेत. येत्या वीस दिवसांत आपल्याला हे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. पुढील महिन्यात शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.एकाच वेळी ७५००० हजार लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment