फार्मसी व्यवसायामध्ये विद्यार्थ्यांना 'उज्वल भविष्य : मा. श्री. विजय पाटील साहेब.

 फार्मसी व्यवसायामध्ये विद्यार्थ्यांना 'उज्वल भविष्य : मा. श्री. विजय पाटील साहेब.


----------------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------------

तुर्केवाडी ( ता. चंदगड;-महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तुर्केवाडीच्या बी. फार्मसी, डी. फार्मसी, पॉलिटेक्निक व

महादेवराव बी. एड. कॉलेज, तुर्केवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा'  दि.

२८ मार्च रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विजय पाटील साहेब (नियंत्रित

संचालक फार्मसी कौन्सिल ऑफ इंडीया तसेच अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल, मुंबई ) हे होते तर

अध्यक्षस्थान संस्था अध्यक्ष मा. श्री. महादेवराव वांद्रे यांनी भूषविले.

"फार्मसी व्यवसायामध्ये विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य असून बदलत्या काळाच्या गरजेनुसार प्रात्यक्षिकाभिमुख

अभ्यासक्रम तयार केला जाईल तसेच एम. पी. एस. सी. मध्ये फार्मसी विषयांचा समावेश व महाराष्ट्रातील

विद्यार्थ्याना व्यवसाय संधी निर्माण करण्यावर भर दिला जाईल त्यामुळे विद्यार्थांनी संशोधन क्षेत्रात अग्रेसर

राहण्याचे अवाहन यावेळी मा. श्री. विजय पाटील साहेब यांनी केले.

'विद्यार्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे " असे

प्रतिपादन अध्यक्ष मा. श्री. महादेवराव वांद्रे यांनी केले.

प्रमुख मान्यवराच्या हस्ते वार्षिक क्रीडा स्पर्धा व शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व पारितोषिक

वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्था उपाध्यक्ष मा. श्री. मोहन परब. संचालक मा. श्री. उमर पाटील,

संचालिका सौ. मृणालिनी वांद्रे, मा. श्री. शामराव बेनके, चंदगड ता. केमिस्ट असोसिशन चे मा. श्री. अनिल

होनगेकर, मा. श्री. विजय कलखांबकर, मा. श्री. प्रकाश सुर्यवंशी, (सांगली), मा. श्री. समरजीत गायकवाड

(सांगली), श्री. महेश हेमोते, मा. श्री. देवगोंडा पवार, मा. श्री. विक्रम पाटील, फार्मसी प्राचार्य डॉ. एम. सी. महंतेश,

पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री. एस. पी. गावडे, अधिक्षिका श्रीम. देशपांडे एस. आर. उपप्राचार्य श्री. अमर पाटील,

डॉ. निकिता कणबरकर, श्री व्ही. पी. गुरव, श्री. व्ही. एस. यादव, श्री. ए. आर. मधाळे, श्री एस. के. कांबळे आदी

मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख प्रा. श्री. ग. गो. प्रधान यांनी केले तर आभार प्र. प्राचार्य श्री. एन. जे.कांबळे यांनी मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बी. एड्. प्रशिक्षणार्थी सविता चौगुले व मीरा चौगुले यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.