Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डी.वाय.एस.पी पद्माकर घनवट व सहाय्यक फौजदार विजय शिर्के यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल.

 डी.वाय.एस.पी पद्माकर घनवट व सहाय्यक फौजदार विजय शिर्के यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल.

-------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------

सातारा येथील गुरुकुल शिक्षण संस्थेच्या प्रकरणी एल.सी.बी.चे तत्कालीन  पोनी व सध्याचे डी.वाय.एस.पी.पदमाकर घनवट व सहाय्यक फौजदार विजय शिर्के यांच्या विरोधात खंडणीचा व जबरी चोरीचा गुन्हा सातारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याबाबत  राजेंद्र चोरगे यांनी दिलेली माहिती अशी, २०१७साली चोरगे कुटुंबिय व शाळा प्रशासनाला एलसीबि पोलीसांनी ताब्यात घेतले होते.पोलीसांची ही कारवाई चुकीची असल्याचा दावा चोरगे यांनी केला आहे.यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये तत्कालीन एसपी पंकज देशमुख यांच्याकडे चोरगे यांनी घनवट व शिर्के यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.या अर्जासोबत चोरगे यांनी पोलीसांनी कशा पद्धतीने त्रास देऊन पैसे मागितले आहेत याचे पुरावे दिले. यामध्ये पोलीस २५ लाख रुपयांची मागणी करून त्यातील बारा लाख तीस हजार रुपये घेतल्याचे म्हटलं आहे. एस.पी.पंकज देशमुख यांनी यांची गंभीर दखल घेतली व दोन्ही पोलिस अधिकारी यांची प्राथमिक चौकशी त्यावेळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे लावणेत आली होती. पुढे एकुण पाच अधिकारी यांनी दोघांची चौकशी केली. यातूनच शिर्के यांच्या विरोधात खात्यांतर्गत कारवाई देखील करण्यात आली. मात्र दोन्ही पोलीसांविरुदध भक्कम पुरावे असल्याने सर्वसामान्य प्रमाणे योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राजेंद्र चोरगे यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक यांचेकडे करत होते मात्र नेमकी कारवाई होत नाही म्हणून चोरगे यांनी जानेवारी २०२३ मध्ये सातारा जिल्हा न्यायालयात प्रायव्हेट तक्रार दाखल केली. कोर्टाने ही तक्रार पाहून ‌सीआरपीसी १९७३ चे कलम १५३(३) प्रमाणे या. प्रकरणाचा तपास करून न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सातारा शहर पोलीसांना कोर्टाची नोटीस मिळताच सोमवारी व मंगळवारी गतीमान‌ हालचाली झाल्या. अखेर सातारा येथील शहर पोलीस ठाण्यात डी.वाय.एस.पी पद्माकर घनवट व सहाय्यक फौजदार विजय शिर्के यांच्या विरोधात खंडणीचा व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments