Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस पक्ष जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार: -नंदकुमार कुंभार.

 काँग्रेस पक्ष जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार;-नंदकुमार  कुंभार.

-------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------

काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी उद्योगपती अदानी यांच्या व्यवसायात वीस हजार कोटी रू.कोणाचे आहेत.  याचे उत्तर मोदी यांना देता आले नाही. देशाचे पैसे घेऊन पळालेल्या मोदींबद्दल चोर असे विधान केले होते परंतू भाजपचा खोटा मुखवटा जनतेसमोर येऊ नये म्हणून त्यांनी राहुल गांधी यांचे निलंबन हे लोकशाहीच्या विरोधात आहे . म्हणून काँग्रेस जनतेच्या दरबारात न्याय मागणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी काँग्रेस बैठकीत सांगितले . 

ते शहरातील मोमीन मोहल्ला येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. ते म्हणाले स्वातंत्र्यपूर्व काळापासून क्रांतीकारांचा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे . स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवून शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी काँग्रेस पक्षाने काम केले आहे. देशाची सर्व मालमत्ता ही सामान्य जनतेची असून याला कोणी संपत असेल तर त्यांच्या पूर्वजांनी राखून ठेवले आहे.  त्यांचा वंशज कधीही गप्प बसणार नाहीत . काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांचे लोकसभा सदस्य रद्द करण्याची कारवाई धक्कादायक असून हे उघड उघड संवेदनातील मूल्यांची पायमल्ली आहे.  चोरांना चोर म्हटले तर दोन वर्षाची सजा होते.  मात्र ज्या नेत्यांच्याकडून आणि मंत्र्यांच्या कडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सातत्याने अपमान केला जातो. महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केली जातात. अशावेळी केंद्र सरकार व राज्य सरकार इतक्यात तत्परतेने कार्यवाही का करत नाही. याचाही खुलासा होणे आवश्यक आहे .  ज्या लोकांच्या वर आर्थिक गुन्हेगारी यांची चौकशी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मार्फत करण्यापासून केंद्र सरकार का लक्ष घालत नाही ?   संसदेपासून ते रस्त्यापर्यंत सर्वत्र मुस्कटदाबी करून केंद्र सरकार हुकूमशहासारखे वागत आहे. 

भारत जोडो यात्रेमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात राहुल गांधी यांच्या बद्दल आपुलकी निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप सैरभैर झाले आहे.  भांडवलदार उद्योगपतीच्या १४.५ लाख कोटीचे कर्जमाफीचे कारण विचारात आहेत इकडे सर्वसामान्य  बारा बलुतेदार एस .सी , एस . टी ,  ओबीसी यांना जमिनी नाहीत. ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन त्यांची कला असून त्यांचे पारंपारिक व्यवसाय डबघाईला आले आहेत.  अशा सर्वसामान्यांचे कर्ज माफ होत नाही. मग उद्योगपतींचे का ? हे राहुल गांधी विचारत आहेत.         भारतीय बँकांच्या थकबाकीदारांच्या ८८ हजार कोटीच्या लुटी विरोधात एसबीआय ,एलआयसी आणि बँकेकडून आदानी वरील ८० हजार कोटी ,  आदानी यांच्या ३८ बनावट कंपन्या ,  फरारी निरव मोदी १४ हजार कोटी ,  पंतप्रधानांच्या मेहुल भाई ,  नोटबंदी घोटाळ्याबद्दल ,  बेरोजगारी , महागाईच्या विरोधात व सर्व भ्रष्टाचारी यंत्रणे विरोधात आवाज उठवल्यामुळे सर्व भ्रष्टाचारी संतापली आहेत .  याचाच परिणाम म्हणून राहुल गांधी यांचे निलंबन घटनाबाह्य पद्धतीने केलेले दिसते ओबीसी समाजाचा आधार घेत देशांमध्ये ओबीसी समाजाचा अपमान झाला म्हणून महाराष्ट्र मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात जे आंदोलन पुकारले आहे ते चुकीचे आहे.  मोदी हे ओबीसी नाहीतच शिवाय राहुल गांधी यांची तुलना देशातील सर्वात मोठ्या चोरांबद्दल भाजपाने करणे हे लज्जास्पद व निंदणीय आहे.ओबीसींचे खरे शत्रू आरएसएस व भाजपा हेच आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी  सत्ता द्या मी लगेच ओबीसी आरक्षण लागू करतो परंतु गेले आठ नऊ महिने सत्ता येऊन ही ओबीसी आरक्षणाचा विषय घेतलेला दिसत नाही. 

या बैठकीला धनंजय कुलकर्णी , प्रदेश उपाध्यक्ष रोजगार स्वयंरोजगार सलमान आवटी , ओबीसी विभाग विभागीय उपाध्यक्ष वाळवा तालुका सेवादल अध्यक्ष संदीप मोहिते , वाळवा तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष बालम मोमीन ,  अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आयुब पठाण , धनाजी शिरतोडे जाकीर जमादार , सुहास पाटील ,राजेंद्र पाटील , प्रथमेश पाटील , कुमार जाधव आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. उल्ला मोमीन यांनी स्वागत  व आभार फरान मोमीन यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वळीव यांनी केले.

Post a Comment

0 Comments