अवैधरित्या जळावू लाकूड वाहतूक करणारा टेम्पो प्रादेशिक वनविभागाने पकडला.

 अवैधरित्या जळावू लाकूड वाहतूक करणारा टेम्पो प्रादेशिक वनविभागाने पकडला. 

-----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

राधानगरी प्रतिनिधी 

 विजय बकरे

------------------------------------------

अवैद्यरित्या जळाऊ लाकूड वाहतूक करणाऱ्या  चालकाला टेम्पोसह प्रादेशिक वन विभागाने ताब्यात घेऊन, त्याच्यावर वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय, भुदरगड तालुक्यातील महालवाडी येथील अशोक भागोजी मोरे याला वन विभागांने टेम्पो आणि मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

शुक्रवारी रात्री कोल्हापूर राधानगरी रोडवरती राशीवडे बुद्रुक वनपरिक्षेत्रातील अधिकारी गस्त घालत असताना घोटवडे येथे रस्त्यावर आयसर (टेम्पो क्रमांक एम एच ०९पीसी ६३७९) मधून जळाऊ  बिगरपासी लाकूड वाहतूक करताना ट्रक आढळून आला.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ड्रायव्हरकडे पासची मागणी केली असता.  वाहतूक पास नसल्याचे आढळून आले. त्यानुसार अवैद्यरीत्या लाकूड वाहतूक करणारा अशोक भागोजी मोरे यांच्यावर भारतीय वन अधिनियमानुसार वन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली टेम्पोसह ताब्यात घेतले आहे. 

  या कारवाईत वनक्षेत्रपाल अविनाश  तायनाक ,वनपाल विश्वास पाटील ,वनरक्षक उत्तम भिसे, संजय पवार ,ज्योतीराम कवडे, संतोष करपे यांनी सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.