घरांसाठी सिडको भवनसमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा..
घरांसाठी सिडको भवनसमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा..
------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------
नवी मुंबई :- सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी सिडको अंतर्गत एमआरडी द्वारे विकास आराखड्यानुसार कोपरखैरणे सेक्टर 4 येथील महात्मा फुले नगर झोपडपट्टीवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली होती. रहिवासी असल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे सादर करून वेळोवेळी पाठपुरावा करून देखील खोटी आश्वासने देऊन सिडको प्रशासन अधिकारी गरिबांची थट्टा करत आहे असा थेट आरोप महात्मा फुले नगर रहिवाशी नागरिकांचे प्रतिनिधी तसेच युवा नेते आदित्य चिकटे यांनी केला असून येत्या काळात लवकरात लवकर घराचे वाटप व्हावे अन्यथा सिडको भवन समोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment