Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय उद्योगरत्न आण्णासाहेब उपाध्ये सर यांना ए. जे. सोशल वेल्फेअर फौंडेशन (महाराष्ट्र राज्य) मार्फत देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर.

 भारतीय उद्योगरत्न आण्णासाहेब उपाध्ये सर यांना ए. जे. सोशल वेल्फेअर फौंडेशन (महाराष्ट्र राज्य) मार्फत देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर.

----------------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------------

ए.जे. सोशल वेल्फेअर फौंडेशन (महाराष्ट्र राज्य) मार्फत कला, क्रीडा, साहित्य, समाज, उद्योग, शिक्षण, युवक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये असाधारण कार्य करणा-या मराठी रत्नांना देण्यात येणारा “राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2023” पुरस्कार नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड(सांगली) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. आण्णासाहेब उपाध्ये सर यांनी शिक्षण, उद्योग व सामाजिक क्षेत्रात गेल्या 50  वर्षाहून अधिककाळ कार्यरत राहून केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल सुप्रसिध्द टिव्ही कलाकार अभिनेते श्री. संदिप पाठक यांचे हस्ते प्रदान करणेत येणार आहे. 

 उपाध्ये सरांची ओळख “शुन्यातून विश्वनिर्मिती साकारणारे” व्यक्तीमत्व म्हणुन केली जाते. सरांनी नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड च्या माध्यमातून सुरू असलेल्या अकुज शैक्षणिक समुहामध्ये इ. बालवाडी पासून ते 12 वी पर्यत उच्च दर्जाचे शिक्षण देणा-या शाळा स्थापन केल्या आज या शाळांमध्ये 3000 च्या जवळपास विद्यार्थी-विद्यार्थींनी शिक्षण घेत आहेत. हजारो विद्यार्थी अनेक पदावर कार्यरत आहेत. उद्याच्या सजग पिढीसाठी विद्यार्थ्यांना पोलिस भरती, सैन्य भरती, अग्नीवीर, NDA, स्पर्धा परीक्षा,  UPSC, MPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन अशा विविध  अभ्यासक्रमाचे शिक्षण व प्रशिक्षण घेता यावे यासाठी वीर सावरकर करिअर ॲकॅडमीची स्थापना केली आज अनेक विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेवून अग्नीवीर, पोलिस भरती व सैन्य भरतीमध्ये प्रयत्नशील आहेत. अकुज कॉम्प्युटर व टाईपरायटिंग च्या माध्यमातून संगणक व टायपिंगचे प्रशिक्षण घेवुन आज अनेक विद्यार्थी विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये अधिकारी व लिपिक म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून सरांनी सामान्य व गरजू मुलां-मुलींना रोजगार उपलब्ध करून दिला असे म्हणावे लागेल. उपाध्ये सरांनी “अकुज्” उद्योग समुहाच्या माध्यमातून व्यावसायिक यश सपांदन केले आहे. 

 यापूर्वी त्यांना भारतीय उद्योगरत्न, साने गुरूजी पुरस्कार, जैन समाजभूषण, अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र असे अनेक नामकिंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना ए.जे. सोशल वेल्फेअर फौंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांचे मार्फत राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल सरांचे विविधस्तरातून अभिनंदन होत आहे.

 राज्यस्तरीय मराठी रत्न गौरव सोहळा-2023 रविवार दि. 26 मार्च 2023 रोजी सायंकाळी ठिक 5.00 वाजता इंचलकरजी (कोल्हापूर) येथे आयोजित केला आहे.

Post a Comment

0 Comments