बाबासाहेब आंबेडकरांसाठी रक्तपात झाला तरी चालेल.

 बाबासाहेब आंबेडकरांसाठी रक्तपात झाला तरी चालेल.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

जयसिंगपूर प्रतिनिधी 

राहुल कांबळे

------------------------------------

जयसिंगपूर मध्ये गेल्या सातरा दिवसापासून क्रांती. चौकातील जुन्या न्यायालयीन इमारतीच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा व म्युझीयम व्हावे याकरिता साखळी उपोषण सुरु आहे.सदर उपोषण संदर्भात प्रशासन मात्र मूक गिळून बसलेले दिसत आहे. पण सदर उपोषणाकडे दुर्लक्ष करण्याचे नेमके कारण काय? का जयसिंगपूर चे मुख्याधिकारी राजकीय दबावाखाली आहे. जर राजकीय दाबावाखाली असतील तर मग मुख्याधिकारी  खातो धन्याच आणि नाव मात्र गाण्याचं असं चालू असल्याची चर्चेने वेग धरल्याच जयसिंगपूर नव्हे तर संपूर्ण शिरोळ तालुक्यात धरलेला पाहायला मिळत आहे. तसेच असाच दबावाखाली प्रशासन काम करणार असेल तर मग लोकशाही पांघरून ओढण्याचं ढोंग तरी कश्याला अशी सुद्धा वक्तव्य आता बहुजन समाजातील काही नेत्यांनी देखील केली आहे.

   जयसिंगपूर मधील क्रांती चौकतील जून्या न्यायालयालीन इमारती मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा होण्या करिता आता    गेल्या सतरा दिवसापासून सुरु असलेल्या उपोषणाला आता शिरोळ तालुकायातील जवळपास पन्नास गावातील बहुजन समाजाचा पाठिंबा देखील मिळत आहे. मग प्रशासनवरती दबाव टाकणारे राजकीय पुढारी तालुक्यातील पन्नास गावा पेक्षा मोठे आहेत काय?असा प्रश्न आता जनतेच्या मनात घर करत असताना दिसत आहे.गेली सतरा दिवस प्रशासन आंदोलन कर्त्यांची विचारपूस न करून खिल्ली उडवत असल्याची दिसत आहे.

  पण आता मात्र शिरोळ तालुक्यातील समस्त बहुजन समाजातील जनतेचा आता उर पेटून उठलेला दिसत आहे म्हणून दिनांक 28 मार्च 2023 रोजी जयसिंगपूर नगरपरिषद च्या निषेधार्थ थिर्डी आंदोलन करणार असल्याचे निवेदन उपोषण कर्त्यांनी दिले आहे. तसेच इथून पुढे आंदोलनाची तीव्रता देखील वाढवणार असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले आहे.

  पुढील महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने प्रशासने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा जयसिंगपूर शहरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्र याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नसून आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी आत्मदहन देखील करू अशी प्रतिक्रिया मा श्रीपती सावंत सर यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.