परळीची पाणी योजना पूर्ण कधी होणार?
परळीची पाणी योजना पूर्ण कधी होणार?
---------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
किती निधी उपलब्ध याबाबत ही ग्रामपंचायत अनभिध्य; गावातील खुदाईमुळे रस्त्याची लागली वाट पाईपलाईनला गळती.
आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले व माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैय्या भोसले यांच्या अथक प्रयत्नातून परळी गावाला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची योजना मंजूर झाली मात्र प्राधिकरण व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पावसाच्या अगोदर ही योजना पूर्णत्वास जाईल की नाही अशी शक्यता निर्माण झाली असून सुमारे दहा ते बारा कोटी रुपयांची ही योजना असून या योजनेला मंजुरी कधी मिळाली ?ही योजना पूर्ण कधी होणार? तसेच अंतर्गत पाईपलाईन कशी आहे? त्याचे फिल्टरेशन पाण्याच्या टाक्या याबाबत कोणताही फलक न लावल्यामुळे या योजनेबाबत दस्तुरखुर्द परळी गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांना प्रत्यक्षात या योजनेला किती कोटीचा निधी उपलब्ध आहे त्याची तांत्रिक माहिती कोणालाही उपलब्ध नसल्यामुळे यात काही काळभैर आहे की काय? अशी शक्यताही निर्माण झाली असून;
या योजनेच्या अपुऱ्या कामामुळे गावातील रस्ते उखंडले गेले आहेत तसेच जुन्या पाईपलाईनला खुदाई केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाईपलाईनला गळती निर्माण झाल्यामुळे सुरू असलेल्या पाणी योजनाही वारंवार अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत परळीचे सरपंच बाळकृष्ण जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ही योजना तात्काळ मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून ही योजना पूर्ण होईल मात्र प्रत्यक्षात कधी पूर्ण होईल किंवा त्याला किती मंजुरी मिळाली आहे फलक का लावले नाहीत याबाबत त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत . शासनाच्या आदेशानुसार कोणतेही शासकीय काम मंजूर झाल्यानंतर त्या कामाची सुरुवात करताना त्या ठिकाणी त्याची मंजुरी रक्कम कामाला कधी मंजुरी मिळाली काम पूर्णत्वास कधी जाणार आहे तसेच त्यासाठी निधी किती उपलब्ध झाला आहे अशा सर्व माहितीचे फलक कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकारक असते मात्र या सर्व गोष्टींची गोपनीयता का बाळगण्यात आली आहे असा प्रश्नही परळी येथील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत
Comments
Post a Comment