कृषि बाजार समिती धुमशान.
कृषि बाजार समिती धुमशान.
---------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
ऐन उन्हाळात जनता थंडावली आणि जिल्हातील कृषि बाजार समिती तापत चालली आहे '
जावली तालुक्यासह सातारा , कराड , पाटण , कोरेगाव , वडूज , फलटण , लोणंद , वाई - महाबळेश्वर अशा नऊ कृषि उत्पन्न बाजार समित्यांसाठी सोमवार दि 27/032023 पासून निवडणुक प्रक्रियाचे धुमशान सुरु होत आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रारंभ होत आहे . २० एप्रिल २३ हा अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे . या दिवसीच बाजार समितीच्या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे .
जावली , वाई - महाबळेश्वर , सातारा , कराड , पाटण , कोरेगाव , वडूज , फलटण , लोणंद या बाजार समितीच्या प्रत्येक १८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे . दि . २ ७ मार्च ते 3 एप्रिल २०२३ अखेर त्या - त्या बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यालयात सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत ' दि . ५ एप्रिल २० २३ रोजी सकाळी ११:00 वाजता उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे . दिनांक ६ एप्रिल २० २३ रोजी सकाळी ११:00 वाजता वैध उमेदवार अजीची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे . २० एप्रिल अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. २१ एप्रिल रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे . रविवार दि . ३० / ०४ / २०२३ रोजी ज्या - त्या मतदान केंदावर मतदान होणार आहे . मतदान सपल्या नंतर त्याच दिवशी अर्धा तासा नंतर मत मोजणीस प्रारंभ होणार आहे . नऊ कृषि बाजार समिती निवडणूक प्रक्रियासाठी निवडणूक अधिकारी म्हणून शंकर पाटील , संदिप जाधव , उमेश उंबरदंड , प्रिती काळे , सुषमा शिंदे , सुनिल धायगुडे , देवीदास मिसाळ , जी . टी . खामकर ,नाना साहेब रुपनवर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी मनोहर माळी यांनी दिली .
दरम्यान आज सोमवार पासून खरे निवडणूकीचे धुमशान सुरु होत आहे . प्रत्येक तालुक्यातील राजकीय वातावरण ऐन उन्हाळयाच्या थंडीत चांगलेच तापणार आहे . सत्या संघर्षाच्या काळात बाजार समिती कोणाच्या तायब्यात जाणार हे दि ३० एप्रिल २०२३ रोजी स्पष्ट होईल इकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे .
कृषि बाजार समितीची निवडणूक हि बिनविरोध होवावी हि जिल्हातील बळीराजाचे मत आहे .
Comments
Post a Comment