महिलांची अश्लील चित्रफित काढणाऱ्या " त्या" बोगस डॉक्टर विरोधात मुरगूडमध्ये निषेध मोर्चा.
महिलांची अश्लील चित्रफित काढणाऱ्या " त्या" बोगस डॉक्टर विरोधात मुरगूडमध्ये निषेध मोर्चा.
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
चित्रफीत व्हायरल करणाऱ्यालाही सत्वर ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्याची शहरवासीयांची मागणी
महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेत अश्लील चित्रफित काढणाऱ्या बोगस आयुर्वेदीक वैद्यावर सत्वर कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी मुरगूड शहरवासीयानी बुधवारी सकाळी दहा वाजता शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आल्या. शहरातील मुख्य बाजार पेठेतील नाका नंबर एक पासून मोर्चाला सुखात झाली. मोठ्या संखेने मुरगूड शहरवासीय मोर्चात सहभागी झाले होते.
या नराधमाचं करायचं काय खाली डोकं वर पाय. बोगस वैद्याचा धिक्कार असो.या बोगस वैद्य डॉक्टराला फाशी झालीच पाहिजे.
घोषणा देत मोर्चा मुरगूड पोलील ठाण्या समोर आला. मुरगूड वासीयांनी मुरगूडचे सपोनि यांच्या कडे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, मुरगूड हे क्रांतीकारकाचे गाव आहे. बोगस डॉक्टर मुळे शहराची प्रतिमा मलीन होत आहे. कथीत डॉक्टरने माईलांची अश्लील चित्रफीत काढून केलेल्या काळ्या कृत्याचा मुरगूड वासीयाना त्रास होत आहे. महिलांची गरीबी आणि असहाय्यतेचा फायदा, पैशाचे अमिश दाखवून चित्रफीती तयार केल्या आहेत. बदनामीची भीती आणि त्या नराधम वैद्याची दशहत म्हणून पीडीत महिला पोलीसात तक्रार द्यायला येत नाहीत. मुरगूडच्या महिलांकडून पीडीत महिलांना न्याय मिळावा अशी शहरवासियांना पत्रे आणि " त्या" नराधमाने काढलेल्या चित्रफीतीचे फोटो मिळाले आहेत. याचा गाभीर्याने विचार होऊुन त्या नराधमाला अटक करून त्याच्या वर कडक कारवाई करावी. असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सुपूर्द केल्यानंतर मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान , नामदेवराव मेंडके, पांडूरंग भाट, माजी उपनगराध्यक्ष
जयसिंगराव भोसले, नगरसेवक दतात्रय मंडलिक , जोतिराम सुर्यवंशी (तात्या,)
रणजित , गोट्या कलकुटकी, रणजित सुर्यवंशी आदीनी डॉक्टर विरोधात संतापजणक प्रतीक्रिया व्यक्त केल्या, बोगस वैद्याला तत्काळ अटक करून, कसुन चौकशी करून कडक कारवाई करून फाशी द्यावी.अशी भावणा व्यक्त केली. कुणा पीडीत महिलेच्या तक्रार अर्जाची वाट न पाहता पोलीस प्रशासना मार्फत गुन्हा नोंदवावा. " त्या" डॉक्टरला पकडून आणून पोलीशी खाक्या दाखवावा. म्हणजे सत्य बाहेर पडेल. त्या नराधमाचा कोणी पाठीराख्वा असेल तो जनतेसमोर येइल त्याच बरोबर ज्याने क्लीप व्हायरल केली त्यालाही तत्काळ ताव्यात घेऊन सत्य बाहेर काढावे.
सपोनि बडवे यांनी निवेदन स्वीकारून म्हणाले मुरगूड मध्ये महिलांच्या चित्रफीती काढण्याच्या जो प्रकार अत्यंत निंद्य व घृणास्पद आहे. दोषीला कडक व कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. या बाबत पोलीस प्रशासनामार्फत जरूर ती कारवाई सुरु आहे. बदनामीचा, अब्रुचा विचार मनात न आणता एखाद्या पीडीत महिलेने पोलीसात रीतसर तक्रार दिली तर गतीने तपास करून दोषीवर तत्काळ कारवाई करता येते. त्यासाठी महिलांचा नाव गोपनिय ठेवण्यात येईल, त्यांना पोलीस ठाण्यात हजर रहावे लागणार नाही, महिलांची चौकशी महिला पोलीस अधिकाऱ्या मार्फत करुण पोलीस खाते दोषींवर कारवाई करण्यात कुचराई करणार नाही, या आश्वासना नंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला.
सपोनि विकास बडवे यांनी मुरगूड शहरवासीयांकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
२) मोठ्या संखेने सहभागी होऊन मुरगूड वासीयांनी निषेध मोर्चा काढला.
Comments
Post a Comment