सिडको व नमुंमपा विरोधात नागरिकांच्या वतीने निषेध आंदोलन.

 सिडको व नमुंमपा विरोधात नागरिकांच्या वतीने निषेध आंदोलन. 

--------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------

नवी मुंबई :- नवी मुंबई क्षेत्रातील तुर्भे सेक्टर १९ एफ येथील भुखंड क्रमांक १ व ४ वरिल अनधिकृत झोपडपट्टी,व्यवसायिक गाळे, गॅरेज व वाहन पार्किंग बाबत तक्रार वारंवार करूनही आपल्या कार्यालयाकडून होत असलेल्या कारवाईच्या उदासिनतेविरोधात उपरोक्त समितीच्या वतीने दि. २ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सेक्टर २६ वाशी येथील पुनित कॅार्नर सोसायटी समोरील चौकात नागरिकांच्या वतीने तिव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

२७ मार्च रोजी सिडको,नवी मुंबई महानगरपालिका तसेच पोलिस खाते यांना निवेदन देऊन कळवले की, गेले अनेक वर्षे सेक्टर २६ मधील अनेक लोकप्रतिनीधी, समाजसेवक, नागरी सोसायट्या तसेच नागरिकांच्या वतीने सेक्टर १९ एफ तुर्भे येथील भुखंड क्रमांक १ व ४ वरील अनधिकृतझोपडपट्टी,व्यवसायिक गाळे,गॅरेज व अनधिकृत अवजड वाहन पार्किंग बाबत तक्रारी केल्या असून यामुळे या भुखंडांना लागूनच असलेल्या सेक्टर २६ वाशी येथील नागरीकांचे जनजीवन कसे विस्कळीत झाले आहे याबाबत अनेक बैठका घेऊन माहिती दिली. 

या परिसरांत नवी मुंबई परिसरातील नावाजलेल्या दोन इंटरनॅशनल शाळा व एक मराठी तसेच इंग्रजी माध्यम शाळा हाकेच्या अंतरावर आहे. तसेच या परिसरांत सिडको ने निर्माण केलेल्या वसाहतीत तसेच इमारतीत २५ हजारांपेक्षा जास्त नागरीक राहतात. अशा महत्वपुर्ण परिसरांत राजरोसपणे झोपडपट्टी च्या नावाखाली अंमली पदार्थांची विक्री, बांग्लादेशी सारख्या परदेशी नागरीकांचे छुपे वास्तव्य, रात्रीच्या वेळी उघड्यावर देह व्यापार, अनधिकृत ट्रक टर्मीनल सुरू आहे. यामुळे नागरीक हवालदिल झाले आहेत. नागरीक प्रशासनाकडून सतत कारवाईची अपेक्षा करत आहे परंतु यावर आपल्या प्रशासनाकडून कागदी घोडे नाचवण्यापलिकडे कोणतीच ठोस अशी कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध तुटला असून नागरीकांने एकमताने दिनांक २ एप्रिल २०२३ रविवार रोजी वाशी सेक्टर २६ येथील पुनीत कॅार्नर सोसायटी समोरील चौकात सिडको व नवी मुंबई महानगरपालिका प्राधिकारणाविरोधात निषेध आंदोलन करण्याचे ठरवले असून यानुसार स.११ वाजता बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत सदर आंदोलन होणार असून यावेळी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उत्पन्न झाल्यास यास सिडको व महापालिका प्रशासन जवाबदार असेल.

या आशयाचे निवेदन नागरीक कृती समीती चे संयोजक श्री.संकेत डोके, श्री.बाळू माने, श्री.तुषार दरेकर, श्री.किरण शिंदे, श्री. कैलास सगरे, श्री.अमित चौथमोल याच्या उपस्थितीत देण्यात आले व येत्या ६ दिवसात कारवाई न केल्यास नागरिकांच्या माध्यमातून तिव्र आंदोलन करण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.