सांगलीचे सहा. कामगार आयुक्त अनिल गुरव यांचा पदोन्नती बद्दल कृष्णा व्हॅली चेंबरतर्फे सत्कार.
सांगलीचे सहा. कामगार आयुक्त अनिल गुरव यांचा पदोन्नती बद्दल कृष्णा व्हॅली चेंबरतर्फे सत्कार.
---------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------
सांगली येथील सहा. कामगार आयुक्त कार्यालयाचे सहा. आयुक्त अनिल गुरव यांची मुंबई येथील स्वतंत्र औद्योगिक संबंध कार्यालयाकडे कामगार उपायुक्त म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल कृष्णा व्हॅली चेंबरच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चेंबरचे अध्यक्ष सतिश मालू, उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडू एरांडोले, संचालक हरिभाऊ गुरव, रमेश आरवाडे, दिपक मर्दा, अरुण भगत, हेमलता शिंदे, नितीश शहा, रागिणी पाटील, पांडुरंग रुपनर, राजगोंडा पाटील उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना चेअरमन सतिश मालू म्हणाले की, अनिल गुरव साहेबांनी सांगली जिल्हा सहा. कामगार आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कामगारांचे अनेक प्रश्न धडाडीने मार्गी लावले आहेत. त्याच बरोबर कामगाराबाबत असलेल्या अडचणी उद्योजंकाशी चर्चा करून त्या मार्गी लावल्या आहेत. शासकीय सेवेत नोकरी करीत असताना त्यांनी उद्योजक आणि कामगार यांच्यातील महत्वपूर्ण दुवा बनून चांगले काम केलेले आहे. यापुढच्या त्यांच्या वाटचालीस आमच्या मनपूर्वक शुभेच्छा.
यावेळी बोलताना गुरव म्हणाले की, सांगली जिल्ह्यात काम करीत असताना मला उद्योजक व कामगारांचे चांगले सहकार्य लाभले यापुढच्या काळातही स्वतंत्र औद्योगिक संबंध कार्यालयाकडे कामगार उपायुक्त म्हणून काम करीत असताना मी सेर्वोतोपरी सहकार्य करेन.
सांगली येथील सहा. कामगार आयुक्त कार्यालयाचे सहा. आयुक्त अनिल गुरव यांची मुंबई येथील स्वतंत्र औद्योगिक संबंध कार्यालयाकडे कामगार उपायुक्त म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल कृष्णा व्हॅली चेंबरच्या वतीने सत्कार करताना चेंबरचे पदाधिकारी.
Comments
Post a Comment