अचानक भेकराने मोटर सायकलवर उडी मारल्याने मोटरसायकल वरील दोघे जण गंभीर.

 अचानक भेकराने मोटर सायकलवर उडी मारल्याने मोटरसायकल वरील दोघे जण गंभीर.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

---------------------------------------

राधानगरी तालुक्यातील दुर्गमांदवड ते गगनबावडा या मार्गावर मोटरसायकल वरून प्रवास करत असताना अचानक झाडाझुडप्यातून भेकरानी चालत्या मोटरसायकलवर उडी मारल्याने मोटरसायकल वरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की तारळे खुर्द येथील प्रदीप बडोपंत पाटील व निलेश रामचंद्र पाटील हे दोघेजण मोटरसायकल वरून दुर्गमांदवड ते गगनबावडा या रस्त्यावरून जात असताना अचानक झाडाझुडपातून भेकराने त्यांच्या मोटरसायकलवर उडी मारल्याने ते दोघेजण चालत्या मोटरसायकलून पडल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने त्यांना तातडीने खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे व मोटरसायकलचे नुकसान झाले आहे.

त्यासंबंधी वन खात्याला माहिती दिली असून तातडीने वन खात्याने त्यांचा पंचनामा करून मोटरसायकल वरील जखमीना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.