Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अंतरगाव बु येथे 21 वा जगन्नाथ बाबा वर्धापन दिन सोहळा संपन्न..

 अंतरगाव बु येथे 21 वा जगन्नाथ बाबा वर्धापन दिन सोहळा संपन्न..

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मंगेश तिखट-

चंद्रपूर प्रतिनिधी

--------------------------------

झोलबाजीने पुण्यकेले कोट्यानी कोटी म्हणुनी जन्मा आले जन्ननाथ पोटी

कोरपना तालुक्यातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले विदेही जगन्नाथ बाबा यांचे मंदिराचा अंतरगाव बु येथील 22 वा जगन्नाथ बाबा वर्धापन दिन सोहळा अंतरगाव बु येथील जगन्नाथ बाबा मठात मोठ्या उत्साहात पार पडला

या कार्यक्रमाला भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती 

दिनांक 22 मार्च रोज बुधवारला  गुडीपाडव्याला श्री अरुण अडकीने यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली

25 मार्च रोज गुरुवार ला अंतरगाव येथील जगन्नाथ बाबा मठातून सकाळी 7 वाजता भजना सहित पालखीचे प्रस्थान नारंडा या गावाकडे करण्यात आले नारंडा येथील नागरिकांनी भक्ती भावाने या पालखीचे स्वागत करण्यात आले व गावातील नागरिकांनी दर्शन घेतले

25 मार्च रोज रविवार ला सकाळी 7 वाजता अंतरगाव येथे दिंडी काढण्यात आली व पालखी दर्शन देण्यात आले 

कार्यक्रमच्या सुरवातीला उत्कृष्ट भजन म्हणून जगन्नाथ बाबा भारूड महिला भजन मंडळ यांच्या अध्यक्षा पुष्पा सुरेश पिंपळशेंडे व कार्यक्रमाचे अन्नदाते सुरज वडस्कर यांच्या सहपत्नीक व आई यांचा सत्कार मान्यवारांच्या हस्ते करण्यात आला 12:30 मी हं. भ. प. योगेश प्रधान महाराज उमरी केळापूर यांच्या मुखकमलातून कीर्तनचा कार्यक्रम पार पडला प्रधान महाराज यांच्या कीर्तनाला अहिंसा भजन मंडळ अंतरगाव यांनी साथ दिली.कार्यकामाला हं भ  प  सागर प्रजापती महाराज आळंदिकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्यात सुरज शत्रुघणं वडस्कर यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.

गावामधील दिंडी सोहण्यात जय हनुमान पदावली भजन मंडळ अंतरगाव बु जय श्री राम पदावली भजन मंडळ, जगन्नाथ बाबा महिला भारूड भजन मंडळ, रा. तुकडोजी महाराज भजन मंडळ, नरेंद्र माऊली भारूड भजन मंडळ अंतरगाव बु व गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

या कार्यक्रमाच्या शेवटी भक्तनांना अंतरगाव बु जगन्नाथ बाबा यांचे भक्त स्वर्ग. श्री शत्रुघन वडस्कर यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ सुरज वडस्कर यांचे कडून अन्नदान व भोजनदान करण्यात आले

विजेच्या लपंडावाने महाराज व भक्तगन हैराण 

चालू असलेल्या कीर्तनात विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत असल्याने महाराज यांच्या कीर्तनात व्यत्यय येत असल्याने श्रोत्यांमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांविषयी नाराजीचा सुरु उमटत होता

महादेव भैया वडस्कर

अध्यक्ष ज. बाबा मंदिर अंतरगाव बुP

Post a Comment

0 Comments