छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडून 2 कोटी 17 लाख वसूल.

 छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडून 2 कोटी 17 लाख वसूल.

-----------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------

कोल्हापूर : शासकीय कार्यालयाकडील थकबाकी पोटी पाणीपट्टी विशेष वसुली पथकामार्फत वसुलीची कारवाई सुरु होती. या अंतर्गत छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडून पाणी पुरवठा विभागाने यांची मंगळवारी रु.2 कोटी 17 लाख 16 हजार 594 वसूल केले. त्याचबरोबर  सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागाकडून 12 लाख 60 हजार 991 व शाहू शेतकरी महाविघालय, पोलिटेक्नीकल कॉलेज यांच्याकडून 4 लाख 64 हजार 407 रक्कम वसुल करण्यात आली.

महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागामार्फत दि.1 एप्रिल 2022 ते दि.28 मार्च 2023 अखेर पाणीपट्टी विशेष वसुली मोहिमे सुरु होती. यासाठी 5 भरारी पथके तयार करुन शहरातील थकबाकी भरणा न भरलेल्या थकबाकीदारांची नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई सुरु होती. यामध्ये शहरातील ए, बी, सी, डी व ई वॉर्ड या भागामध्ये थकबाकी असलेले 599 नळ कनेक्शन खंडीत करुन रु.51 कोटी 2 लाख 47 हजार 656 इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली आहे.

पाणी पुरवठा विभागाकडे गुगलपे, फोनपे, पेटीएम तसेच ऑनलाईन पेमेट सुविधेद्वारे सुमारे 126594 लोकांनी रु.11 कोटी 9 लाख 68 हजार 121 इतकी रक्कम भरणा केली आहे. तसेच स्पॉटबिल प्रणालीद्वारे रु.4 कोटी 79 लाख 99 हजार 64 इतकी रक्क्म भरणा केली आहे. वसुली पथकामार्फत आजअखेर 6 कोटी 58 लाख 82 हजार 206 इतकी जमा झाली आहे. पाणी पुरवठा वसुली विभागाकने सन 2022-23 या वर्षातील दिलेल्या रु.70 कोटी उदिदष्टापैकी रु.51 कोटी 2 लाख 47 हजार 656 मंगळवारपर्यंत वसूल झाली आहे. हि वसुली साधारणत: 72.89 टक्के इतकी करण्यात आली आहे.

हि कारवाई प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये वसुली पथक प्रमुख मोहन जाधव,अमर बागल,संजय पाटील,मधुकर कदम नरेद्र प्रभावळकर व सर्व मिटर रिडर व सहाय्यक यांनी भाग घेतला

हि वसुली मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असल्याने सर्व खाजगी तसेच शासकीय/निमशासकीय कार्यालयाकडील थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व थकबाकीदारांनी आपली थकीत पाणी बिलाची रक्कम त्वरित भरुन कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.