डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाबाबत निर्णय घेण्याची आठवले गटाची मागणी 14 एप्रिल पूर्वी काम होण्याचं निवेदन सादर .
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाबाबत निर्णय घेण्याची आठवले गटाची मागणी 14 एप्रिल पूर्वी काम होण्याचं निवेदन सादर .
-----------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------
नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असावा ही मागणी सातत्याने रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी समाज करत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने पुतळा बाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली. पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस एल. आर. गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष टिळक जाधव, प्रवक्ते सचिन कटारे, धरमसी भाई पटेल, बालाजी कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या मागणी सोबत वाशी येथील सामान्य रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, धार्मिक स्थळांबाबत नवी मुंबई महानगरपालिकेने आराखडा तयार करावा.
ज्वेल्स ऑफ नवी मुंबई नेरूळ येथे तथागत भगवान गौतम बुद्ध पुतळा लवकरात लवकर बसवावा या मागण्या करण्यात आल्या वरील सर्व मागण्यांबाबत आयुक्त नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
Comments
Post a Comment