Posts

Showing posts from March, 2023

मुलांच्या संवेदनशील मनाला जपा - माधुरी शानभाग.

Image
 मुलांच्या संवेदनशील मनाला जपा  - माधुरी शानभाग. ----------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------- संजय साबळे यांच्या 'बाबांना समजून घेताना ' व 'शाळा विद्यार्थी आणि मी ' या पुस्तकांचे प्रकाशन..  येथील दि न्यू  इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील शिक्षक श्री संजय साबळे यांनी मुलांकडून लिहून संपादित केलेल्या 'बाबांना समजावून घेताना ' व शाळा, विद्यार्थी आणि मी 'या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध साहित्यिका माधुरी शानभाग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माधुरी शानभाग म्हणाल्या की, "शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना स्व अनुभव लिहिण्याची  संधी दिली पाहिजेत. आपले अनुभव त्यांनी व्यक्त केले तर भावी जीवनात ते नक्की यशस्वी होतील. आपल्या भावना ,वेदना शब्दात व्यक्त करणे ही कला आहे आणि ती विद्यार्थीदशेतच जोपासली पाहिजे. यातूनच अशा प्रकारचे साहित्य निर्माण होते. " पुस्तकाचे संपादक संजय साबळे म्हणाले , "विद्यार्थ्यांच्या लिहित्या हातांना बळ दिले तर

परळीतील "पुतळाबाईचा ओढा "धोकादायक.

Image
 परळीतील "पुतळाबाईचा ओढा "धोकादायक.  ------------------------------------------------------------------------ ------------------------------------------------------------------------ परळी :परळीतून नित्रळ कडे जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्या नजीक "पुतळाबाईचा ओढा "आहे हा रस्ता रहदरीचा आहे, हा रस्ता खूप उताराचा व वळणाचा आहे त्यामुळे इथे दुचाकी व चारचाकी वाहने घसरतात, ब्रेक लागत नाहीत, वाहने पलटी होण्याची शक्यता आहे, इथे बरेच जीवघेणे  अपघात झाले आहेत, त्यामुळे येथील स्थानिक लोकांची प्रशासनाकडे मागणी आहे की, सदर ठिकाणी संरक्षक कठडे बांदावे अथवा रस्ता रुंदीकरण करावे व होणारे अपघात टाळावे.

कु प्रगती शिसाळ हिची ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेत अभिनंदनीय निवड!

Image
 कु प्रगती शिसाळ हिची ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेत अभिनंदनीय निवड! --------------------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------------------- इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेली चरण गावाची सुकन्या कु प्रगती भानुदास शिसाळ हिने सन 2022/23 मध्ये झालेल्या सैनिक स्कूल परीक्षेत 300/259 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले लेखी फिजिकल, मेडिकल फिट होऊन तिची कर्नाटक राज्यातील कोडगु या नॅशनल सैनिक स्कूल साठी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तिला येळाने व येलूर शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले कु प्रगती शिसाळ हिच्या भावी वाटचालीस फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र च्या वतीने  हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

फार्मसी व्यवसायामध्ये विद्यार्थ्यांना 'उज्वल भविष्य : मा. श्री. विजय पाटील साहेब.

Image
 फार्मसी व्यवसायामध्ये विद्यार्थ्यांना 'उज्वल भविष्य : मा. श्री. विजय पाटील साहेब. ---------------------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------------------- तुर्केवाडी ( ता. चंदगड;-महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तुर्केवाडीच्या बी. फार्मसी, डी. फार्मसी, पॉलिटेक्निक व महादेवराव बी. एड. कॉलेज, तुर्केवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा'  दि. २८ मार्च रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विजय पाटील साहेब (नियंत्रित संचालक फार्मसी कौन्सिल ऑफ इंडीया तसेच अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल, मुंबई ) हे होते तर अध्यक्षस्थान संस्था अध्यक्ष मा. श्री. महादेवराव वांद्रे यांनी भूषविले. "फार्मसी व्यवसायामध्ये विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य असून बदलत्या काळाच्या गरजेनुसार प्रात्यक्षिकाभिमुख अभ्यासक्रम तयार केला जाईल तसेच एम. पी. एस. सी. मध्ये फार्मसी विषयांचा समावेश व महाराष्ट्रातील विद्यार्थ्याना व्यवसाय संधी निर्मा

सिडको व नमुंमपा विरोधात नागरिकांच्या वतीने निषेध आंदोलन.

Image
 सिडको व नमुंमपा विरोधात नागरिकांच्या वतीने निषेध आंदोलन.  -------------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------------- नवी मुंबई :- नवी मुंबई क्षेत्रातील तुर्भे सेक्टर १९ एफ येथील भुखंड क्रमांक १ व ४ वरिल अनधिकृत झोपडपट्टी,व्यवसायिक गाळे, गॅरेज व वाहन पार्किंग बाबत तक्रार वारंवार करूनही आपल्या कार्यालयाकडून होत असलेल्या कारवाईच्या उदासिनतेविरोधात उपरोक्त समितीच्या वतीने दि. २ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सेक्टर २६ वाशी येथील पुनित कॅार्नर सोसायटी समोरील चौकात नागरिकांच्या वतीने तिव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. २७ मार्च रोजी सिडको,नवी मुंबई महानगरपालिका तसेच पोलिस खाते यांना निवेदन देऊन कळवले की, गेले अनेक वर्षे सेक्टर २६ मधील अनेक लोकप्रतिनीधी, समाजसेवक, नागरी सोसायट्या तसेच नागरिकांच्या वतीने सेक्टर १९ एफ तुर्भे येथील भुखंड क्रमांक १ व ४ वरील अनधिकृतझोपडपट्टी,व्यवसायिक गाळे,गॅरेज व अनधिकृत अवजड वाहन पार्किंग बाबत तक्रारी केल्या असून यामुळे या भुखंडांना लागूनच असलेल्

महिलांची अश्लील चित्रफित काढणाऱ्या " त्या" बोगस डॉक्टर विरोधात मुरगूडमध्ये निषेध मोर्चा.

Image
 महिलांची अश्लील चित्रफित काढणाऱ्या " त्या" बोगस डॉक्टर विरोधात मुरगूडमध्ये निषेध मोर्चा. ------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------- चित्रफीत व्हायरल करणाऱ्यालाही सत्वर  ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्याची  शहरवासीयांची  मागणी  महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेत अश्लील चित्रफित काढणाऱ्या बोगस आयुर्वेदीक वैद्यावर सत्वर कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी मुरगूड शहरवासीयानी  बुधवारी सकाळी दहा वाजता शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आल्या. शहरातील  मुख्य बाजार पेठेतील नाका नंबर एक पासून मोर्चाला सुखात झाली. मोठ्या संखेने मुरगूड शहरवासीय मोर्चात सहभागी झाले होते. या नराधमाचं करायचं काय खाली डोकं वर पाय.  बोगस वैद्याचा धिक्कार असो.या बोगस वैद्य डॉक्टराला फाशी झालीच पाहिजे.    घोषणा देत मोर्चा मुरगूड पोलील ठाण्या समोर आला. मुरगूड वासीयांनी  मुरगूडचे सपोनि यांच्या कडे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, मुरगूड हे क्रांतीकारकाचे गाव आहे. बोगस डॉक्टर मुळे शहराची प्रतिमा मलीन होत आ

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडून 2 कोटी 17 लाख वसूल.

Image
 छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडून 2 कोटी 17 लाख वसूल. ----------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------- कोल्हापूर : शासकीय कार्यालयाकडील थकबाकी पोटी पाणीपट्टी विशेष वसुली पथकामार्फत वसुलीची कारवाई सुरु होती. या अंतर्गत छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडून पाणी पुरवठा विभागाने यांची मंगळवारी रु.2 कोटी 17 लाख 16 हजार 594 वसूल केले. त्याचबरोबर  सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागाकडून 12 लाख 60 हजार 991 व शाहू शेतकरी महाविघालय, पोलिटेक्नीकल कॉलेज यांच्याकडून 4 लाख 64 हजार 407 रक्कम वसुल करण्यात आली. महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागामार्फत दि.1 एप्रिल 2022 ते दि.28 मार्च 2023 अखेर पाणीपट्टी विशेष वसुली मोहिमे सुरु होती. यासाठी 5 भरारी पथके तयार करुन शहरातील थकबाकी भरणा न भरलेल्या थकबाकीदारांची नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई सुरु होती. यामध्ये शहरातील ए, बी, सी, डी व ई वॉर्ड या भागामध्ये थकबाकी असलेले 599 नळ क नेक्शन खंडीत करुन रु.51 कोटी 2 लाख 47 हजार 656 इतकी थकीत रक्कम वसुल कर

डी.वाय.एस.पी पद्माकर घनवट व सहाय्यक फौजदार विजय शिर्के यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल.

Image
 डी.वाय.एस.पी पद्माकर घनवट व सहाय्यक फौजदार विजय शिर्के यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल. ------------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------------- सातारा येथील गुरुकुल शिक्षण संस्थेच्या प्रकरणी एल.सी.बी.चे तत्कालीन  पोनी व सध्याचे डी.वाय.एस.पी.पदमाकर घनवट व सहाय्यक फौजदार विजय शिर्के यांच्या विरोधात खंडणीचा व जबरी चोरीचा गुन्हा सातारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याबाबत  राजेंद्र चोरगे यांनी दिलेली माहिती अशी, २०१७साली चोरगे कुटुंबिय व शाळा प्रशासनाला एलसीबि पोलीसांनी ताब्यात घेतले होते.पोलीसांची ही कारवाई चुकीची असल्याचा दावा चोरगे यांनी केला आहे.यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये तत्कालीन एसपी पंकज देशमुख यांच्याकडे चोरगे यांनी घनवट व शिर्के यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.या अर्जासोबत चोरगे यांनी पोलीसांनी कशा पद्धतीने त्रास देऊन पैसे मागितले आहेत याचे पुरावे दिले. यामध्ये पोलीस २५ लाख रुपयांची मागणी करून त्यातील बारा लाख तीस हजार रुपये घेतल्याचे म्हटलं आहे. एस.प

फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्रच्या बातमीचा परिणाम!तात्काळ विद्युत खांबाची दुरुस्त

Image
  फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्रच्या बातमीचा परिणाम!तात्काळ विद्युत खांबाची दुरुस्ती!  ---------------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------------- सातारा येथील गोडोली वनरोपवाटीके समोर रस्त्यावर अज्ञात वाहनाने विद्युत खांंबाला धडक दिल्याने सदर खांब‌ रस्त्यावर वाकल्या मुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक, तसेच वाहन चालक यांना जिवीतास धोका निर्माण झाला होता परंतु सदर बाबत आमचे सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी दुरध्वनी द्वारे ‌नगरपालीका सातारा येथील विद्युत अभियंता महेश सावळकर यांना माहिती दिली असताना तात्काळ विद्युत खांब दुरूस्ती करण्याची ग्वाही दिली व तसे आदेश दिले.नागरिक व पादचारी यांना फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र यांना धन्यवाद दिले.

रिपब्लिकन सेना कलावंत कार्यकर्ता मेळावा.

Image
 रिपब्लिकन सेना कलावंत कार्यकर्ता मेळावा. --------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------   नवी मुंबई (उल्हासनगर ):-डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या बहुआयामी चळवळीचा एक अतिशय महत्त्वाचा आयाम म्हणजे सांस्कृतिक विभाग.या विभागातील जलशांनी जी क्रांती केली त्यातूनच पुढे दलित साहित्याचा उगम झाला. साहित्य आणि कला यांच्यामुळे क्रांतीची पार्श्वभूमी तयार होत असते. क्रांतिकारकांच्या मनाची मशागत होत असते. 'जलसा' या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ गाण्याबजावण्याची बैठक, गाण्याची मैफिल, सभा, सम्मेलन, अधिवेशन, उत्सव असा असला तरी आंबेडकरी चळवळीत या शब्दाला ऐतिहासिक व क्रांतिकारी संदर्भ आहेत. सत्यशोधकी विचारधारा, सत्यशोधक समाजाची तत्वप्रणाली, म. फुले, कृष्णराव भालेकर, राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य आणि कर्तृत्व यांना अनुसरणारा आशय असलेल्या सत्यशोधकी जलशांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निर्माण झालेले आंबेडकरी जलसे आणि त्यात काम करणारे कलावंतकार्यकर्ते यांचा खऱ्या अर्थाने वारसा चालवायचा असेल तर आजच्या कवी-गायक-

पॅन कार्ड लिंक साठी जो दंड लावला तो मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन.

Image
 पॅन कार्ड लिंक साठी जो दंड लावला तो मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन. ----------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र राधानगरी  प्रतिनिधी विजय बकरे ----------------------------------------------- रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना.देशात गेली ८ ते ९ वर्ष महागाई ने उच्चांक गाठलेला आहे. अशातच कोराणाचे संकट, नैसर्गिक संकटे सातत्याने देशासमोर उभी आहेत. शेतक-यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. पेट्रोल व डिझेलच्यां  किंमतीमध्ये भरमसाठ वाढ, गॅसची दर वाढ डाळी खाद्य तेल अशा जिवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत . जीएसटी ने सर्वानचेच  कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार आधार सोबत पॅनकार्ड  लिंक करणेसाठी सध्या १०००/- रूपये  दंड लावला आहे. व तो 31 मार्चनंतर १०,०००/- रु होणार आहे. अगोदरच देशातील गोरगरीब शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यावसायिक महागाईने मेटाकुटीला आले आहेत असे असताना पॅन कार्ड लिंक साठी जो दंड लावला आहे तो ताबडतोब मागे घेऊन सामान्य जनतेला न्याय द्यावा  अन्यथा सामान्य जनता रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे हजारो कोटी रुपये बुडवून  मोठ मोठे उ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाबाबत निर्णय घेण्याची आठवले गटाची मागणी 14 एप्रिल पूर्वी काम होण्याचं निवेदन सादर .

Image
  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाबाबत निर्णय घेण्याची आठवले गटाची मागणी 14 एप्रिल पूर्वी काम होण्याचं निवेदन सादर . ----------------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------------- नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असावा ही मागणी सातत्याने रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी समाज करत आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने पुतळा बाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली. पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस एल. आर. गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष टिळक जाधव, प्रवक्ते सचिन कटारे, धरमसी भाई पटेल, बालाजी कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या मागणी सोबत वाशी येथील सामान्य रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, धार्मिक स्थळां

परळीची पाणी योजना पूर्ण कधी होणार?

Image
 परळीची पाणी योजना पूर्ण कधी होणार? --------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------- किती निधी उपलब्ध याबाबत ही ग्रामपंचायत अनभिध्य; गावातील खुदाईमुळे रस्त्याची लागली वाट पाईपलाईनला गळती. आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले व माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैय्या भोसले यांच्या अथक प्रयत्नातून परळी गावाला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची योजना मंजूर झाली मात्र प्राधिकरण व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पावसाच्या अगोदर ही योजना पूर्णत्वास जाईल की नाही अशी शक्यता निर्माण झाली असून सुमारे दहा ते बारा कोटी रुपयांची ही योजना असून या योजनेला मंजुरी कधी मिळाली ?ही योजना पूर्ण कधी होणार? तसेच अंतर्गत पाईपलाईन कशी आहे? त्याचे फिल्टरेशन पाण्याच्या टाक्या याबाबत कोणताही फलक न लावल्यामुळे या योजनेबाबत दस्तुरखुर्द परळी गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांना प्रत्यक्षात या योजनेला किती कोटीचा निधी उपलब्ध आहे त्याची तांत्रिक माहिती कोणालाही उपलब्ध नसल्यामुळे यात काही काळभैर आहे की काय? अशी शक्यताही निर्माण झाली अ

कृषि बाजार समिती धुमशान.

Image
 कृषि बाजार समिती धुमशान. --------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------- ऐन उन्हाळात जनता थंडावली आणि जिल्हातील कृषि बाजार समिती तापत चालली आहे ' जावली तालुक्यासह सातारा , कराड , पाटण , कोरेगाव , वडूज , फलटण , लोणंद , वाई - महाबळेश्वर अशा नऊ कृषि उत्पन्न बाजार समित्यांसाठी सोमवार दि 27/032023 पासून निवडणुक प्रक्रियाचे धुमशान सुरु होत आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रारंभ होत आहे . २० एप्रिल २३ हा अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे . या दिवसीच बाजार समितीच्या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे . जावली , वाई - महाबळेश्वर , सातारा , कराड , पाटण , कोरेगाव , वडूज , फलटण , लोणंद या बाजार समितीच्या प्रत्येक १८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे . दि . २ ७ मार्च ते 3 एप्रिल २०२३ अखेर त्या - त्या बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यालयात सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत ' दि . ५ एप्रिल २० २३ रोजी सकाळी ११:00 वाजता उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे . दि

अचानक भेकराने मोटर सायकलवर उडी मारल्याने मोटरसायकल वरील दोघे जण गंभीर.

Image
 अचानक भेकराने मोटर सायकलवर उडी मारल्याने मोटरसायकल वरील दोघे जण गंभीर. --------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे --------------------------------------- राधानगरी तालुक्यातील दुर्गमांदवड ते गगनबावडा या मार्गावर मोटरसायकल वरून प्रवास करत असताना अचानक झाडाझुडप्यातून भेकरानी चालत्या मोटरसायकलवर उडी मारल्याने मोटरसायकल वरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की तारळे खुर्द येथील प्रदीप बडोपंत पाटील व निलेश रामचंद्र पाटील हे दोघेजण मोटरसायकल वरून दुर्गमांदवड ते गगनबावडा या रस्त्यावरून जात असताना अचानक झाडाझुडपातून भेकराने त्यांच्या मोटरसायकलवर उडी मारल्याने ते दोघेजण चालत्या मोटरसायकलून पडल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने त्यांना तातडीने खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे व मोटरसायकलचे नुकसान झाले आहे. त्यासंबंधी वन खात्याला माहिती दिली असून तातडीने वन खात्याने त्यांचा पंचनामा करून मोटरसायकल वरील जखमीना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.

अंतरगाव बु येथे 21 वा जगन्नाथ बाबा वर्धापन दिन सोहळा संपन्न..

Image
 अंतरगाव बु येथे 21 वा जगन्नाथ बाबा वर्धापन दिन सोहळा संपन्न.. ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मंगेश तिखट- चंद्रपूर प्रतिनिधी -------------------------------- झोलबाजीने पुण्यकेले कोट्यानी कोटी म्हणुनी जन्मा आले जन्ननाथ पोटी कोरपना तालुक्यातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले विदेही जगन्नाथ बाबा यांचे मंदिराचा अंतरगाव बु येथील 22 वा जगन्नाथ बाबा वर्धापन दिन सोहळा अंतरगाव बु येथील जगन्नाथ बाबा मठात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती  दिनांक 22 मार्च रोज बुधवारला  गुडीपाडव्याला श्री अरुण अडकीने यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली 25 मार्च रोज गुरुवार ला अंतरगाव येथील जगन्नाथ बाबा मठातून सकाळी 7 वाजता भजना सहित पालखीचे प्रस्थान नारंडा या गावाकडे करण्यात आले नारंडा येथील नागरिकांनी भक्ती भावाने या पालखीचे स्वागत करण्यात आले व गावातील नागरिकांनी दर्शन घेतले 25 मार्च रोज रविवार ला सकाळी 7 वाजता अंतरगाव येथे दिंडी काढण्यात आली व पालखी दर्शन देण्यात आले  कार्यक्रमच्या सुरवातीला उत्कृष्ट भजन म्हणून जगन्नाथ बाबा भार

बाबासाहेब आंबेडकरांसाठी रक्तपात झाला तरी चालेल.

Image
 बाबासाहेब आंबेडकरांसाठी रक्तपात झाला तरी चालेल. ------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र जयसिंगपूर  प्रतिनिधी  राहुल कांबळे ------------------------------------ जयसिंगपूर मध्ये गेल्या सातरा दिवसापासून क्रांती. चौकातील जुन्या न्यायालयीन इमारतीच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा व म्युझीयम व्हावे याकरिता साखळी उपोषण सुरु आहे.सदर उपोषण संदर्भात प्रशासन मात्र मूक गिळून बसलेले दिसत आहे. पण सदर उपोषणाकडे दुर्लक्ष करण्याचे नेमके कारण काय? का जयसिंगपूर चे मुख्याधिकारी राजकीय दबावाखाली आहे. जर राजकीय दाबावाखाली असतील तर मग मुख्याधिकारी  खातो धन्याच आणि नाव मात्र गाण्याचं असं चालू असल्याची चर्चेने वेग धरल्याच जयसिंगपूर नव्हे तर संपूर्ण शिरोळ तालुक्यात धरलेला पाहायला मिळत आहे. तसेच असाच दबावाखाली प्रशासन काम करणार असेल तर मग लोकशाही पांघरून ओढण्याचं ढोंग तरी कश्याला अशी सुद्धा वक्तव्य आता बहुजन समाजातील काही नेत्यांनी देखील केली आहे.    जयसिंगपूर मधील क्रांती चौकतील जून्या न्यायालयालीन इमारती मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा होण्या करिता आ

अवैधरित्या जळावू लाकूड वाहतूक करणारा टेम्पो प्रादेशिक वनविभागाने पकडला.

Image
 अवैधरित्या जळावू लाकूड वाहतूक करणारा टेम्पो प्रादेशिक वनविभागाने पकडला.  ----------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र राधानगरी प्रतिनिधी   विजय बकरे ------------------------------------------ अवैद्यरित्या जळाऊ लाकूड वाहतूक करणाऱ्या  चालकाला टेम्पोसह प्रादेशिक वन विभागाने ताब्यात घेऊन, त्याच्यावर वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय, भुदरगड तालुक्यातील महालवाडी येथील अशोक भागोजी मोरे याला वन विभागांने टेम्पो आणि मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी रात्री कोल्हापूर राधानगरी रोडवरती राशीवडे बुद्रुक वनपरिक्षेत्रातील अधिकारी गस्त घालत असताना घोटवडे येथे रस्त्यावर आयसर (टेम्पो क्रमांक एम एच ०९पीसी ६३७९) मधून जळाऊ  बिगरपासी लाकूड वाहतूक करताना ट्रक आढळून आला.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ड्रायव्हरकडे पासची मागणी केली असता.  वाहतूक पास नसल्याचे आढळून आले. त्यानुसार अवैद्यरीत्या लाकूड वाहतूक करणारा अशोक भागोजी मोरे यांच्यावर भारतीय वन अधिनियमानुसार वन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली टेम्पोसह ताब्यात घेतले आहे.    या कारवाईत वनक्षेत्रपाल अविनाश  तायनाक ,वनप

काँग्रेस पक्ष जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार: -नंदकुमार कुंभार.

Image
 काँग्रेस पक्ष जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार;-नंदकुमार  कुंभार. ------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------ काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी उद्योगपती अदानी यांच्या व्यवसायात वीस हजार कोटी रू.कोणाचे आहेत.  याचे उत्तर मोदी यांना देता आले नाही. देशाचे पैसे घेऊन पळालेल्या मोदींबद्दल चोर असे विधान केले होते परंतू भाजपचा खोटा मुखवटा जनतेसमोर येऊ नये म्हणून त्यांनी राहुल गांधी यांचे निलंबन हे लोकशाहीच्या विरोधात आहे . म्हणून काँग्रेस जनतेच्या दरबारात न्याय मागणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी काँग्रेस बैठकीत सांगितले .  ते शहरातील मोमीन मोहल्ला येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. ते म्हणाले स्वातंत्र्यपूर्व काळापासून क्रांतीकारांचा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे . स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवून शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी काँग्रेस पक्षाने काम केले आहे. देशाची सर्व मालमत्ता ही सामा

एकाच दिवशी ७५००० लाभार्थ्यांना लाभ देणार_- रूचेश जयवंशी- पुढील महिन्यात शासकीय योजनांची जत्रा.

Image
 एकाच दिवशी ७५००० लाभार्थ्यांना लाभ देणार_- रूचेश जयवंशी- पुढील महिन्यात शासकीय योजनांची जत्रा. ---------------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------------   शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या  योजना एकाच दिवशी किमान ७५००० हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शासकीय योजनांच्या जत्रेचा कार्यक्रम जिल्ह्यात होणार असल्याची माहिती आज सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात  ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी यांनी याबाबत सर्व संबंधित विभागाने करावयाच्या कार्यवाही बाबत‌सुचना दिल्या.यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह सर्व ‌विभागाचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, शासकीय योजना सर्वसामान्यांसाठी पोहचवण्यासाठी हा उपक्रम आहे.यामधये कुरुषि , महिला व बालविकास,गारमीण विकास यंत्रणा, आरोग्य, रोजगार, जिल्हा उद्योग के

जयसिंगपूर नगरपालिका खाते धन्याचे नाव घेते गण्याचे.

Image
 जयसिंगपूर नगरपालिका खाते धन्याचे नाव घेते गण्याचे.  -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र जयसिंगपूर  प्रतिनिधी  राहुल कांबळे ----------------------------------- जयसिंगपूर मध्ये गेल्या सातरा  दिवसापासून क्रांती. चौकातील जुन्या न्यायालयीन इमारतीच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा व म्युझीयम व्हावे याकरिता साखळी उपोषण सुरु आहे.सदर उपोषण संदर्भात प्रशासन मात्र मूक गिळून बसलेले दिसत आहे. पण सदर उपोषणाकडे दुर्लक्ष करण्याचे नेमके कारण काय? का जयसिंगपूर चे मुख्याधिकारी राजकीय दबावाखाली आहे. जर राजकीय दाबावाखाली असतील तर मग मुख्याधिकारी  खातो धन्याच आणि नाव मात्र गाण्याचं असं चालू असल्याची चर्चेने वेग धरल्याच जयसिंगपूर नव्हे तर संपूर्ण शिरोळ तालुक्यात धरलेला पाहायला मिळत आहे. तसेच असाच दबावाखाली प्रशासन काम करणार असेल तर मग लोकशाही पांघरून ओढण्याचं ढोंग तरी कश्याला अशी सुद्धा वक्तव्य आता बहुजन समाजातील काही नेत्यांनी देखील केली आहे.    जयसिंगपूर मधील क्रांती चौकतील जून्या न्यायालयालीन इमारती मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा होण्या क

सांगलीचे सहा. कामगार आयुक्त अनिल गुरव यांचा पदोन्नती बद्दल कृष्णा व्हॅली चेंबरतर्फे सत्कार.

Image
सांगलीचे सहा. कामगार आयुक्त अनिल गुरव यांचा पदोन्नती बद्दल कृष्णा व्हॅली चेंबरतर्फे सत्कार.  --------------------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------------------- सांगली येथील सहा. कामगार आयुक्त कार्यालयाचे सहा. आयुक्त अनिल गुरव यांची मुंबई येथील स्वतंत्र औद्योगिक संबंध कार्यालयाकडे कामगार उपायुक्त म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल  कृष्णा व्हॅली चेंबरच्या वतीने सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी चेंबरचे अध्यक्ष सतिश मालू, उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडू एरांडोले, संचालक हरिभाऊ गुरव, रमेश आरवाडे, दिपक मर्दा, अरुण भगत, हेमलता शिंदे, नितीश शहा, रागिणी पाटील, पांडुरंग रुपनर, राजगोंडा पाटील उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना चेअरमन सतिश मालू म्हणाले की, अनिल गुरव साहेबांनी  सांगली जिल्हा सहा. कामगार आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कामगारांचे अनेक प्रश्न धडाडीने मार्गी लावले आहेत. त्याच बरोबर कामगाराबाबत असलेल्या अडचणी उद्योजंकाशी चर्चा करून त्या मार्गी लावल्या आहेत. शासकीय सेवेत

भारतीय उद्योगरत्न आण्णासाहेब उपाध्ये सर यांना ए. जे. सोशल वेल्फेअर फौंडेशन (महाराष्ट्र राज्य) मार्फत देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर.

Image
 भारतीय उद्योगरत्न आण्णासाहेब उपाध्ये सर यांना ए. जे. सोशल वेल्फेअर फौंडेशन (महाराष्ट्र राज्य) मार्फत देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर. ---------------------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------------------- ए.जे. सोशल वेल्फेअर फौंडेशन (महाराष्ट्र राज्य) मार्फत कला, क्रीडा, साहित्य, समाज, उद्योग, शिक्षण, युवक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये असाधारण कार्य करणा-या मराठी रत्नांना देण्यात येणारा “राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2023” पुरस्कार नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड(सांगली) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. आण्णासाहेब उपाध्ये सर यांनी शिक्षण, उद्योग व सामाजिक क्षेत्रात गेल्या 50  वर्षाहून अधिककाळ कार्यरत राहून केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल सुप्रसिध्द टिव्ही कलाकार अभिनेते श्री. संदिप पाठक यांचे हस्ते प्रदान करणेत येणार आहे.    उपाध्ये सरांची ओळख “शुन्यातून विश्वनिर्मिती साकारणारे” व्यक्तीमत्व म्हणुन केली जाते. सरांनी नवमहाराष्ट्र शिक

घरांसाठी सिडको भवनसमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा..

Image
 घरांसाठी सिडको भवनसमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा.. ------------------------------------------------------------------------------ ----------------------------------------------------------------------------- नवी मुंबई :- सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी सिडको अंतर्गत एमआरडी द्वारे विकास आराखड्यानुसार कोपरखैरणे सेक्टर 4 येथील महात्मा फुले नगर झोपडपट्टीवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली होती. रहिवासी असल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे सादर करून वेळोवेळी पाठपुरावा करून देखील खोटी आश्वासने देऊन सिडको प्रशासन अधिकारी गरिबांची थट्टा करत आहे असा थेट आरोप महात्मा फुले नगर रहिवाशी नागरिकांचे प्रतिनिधी तसेच युवा नेते आदित्य चिकटे यांनी केला असून येत्या काळात लवकरात लवकर घराचे वाटप व्हावे अन्यथा सिडको भवन समोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नित्रळ -पाटेघर केंद्राचा मेळावा उत्साहात...

Image
 नित्रळ -पाटेघर केंद्राचा मेळावा उत्साहात.. ----------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------- परळी -नित्रळ, पाटेघर केंद्राचा बाळंआनंद मेळावा काढसिद्देश्वर मठ परळी याठिकाणी झाला, कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी जयश्री शिंगाडे, केंद्र प्रमुख उज्वला कुलकर्णी, स्वामी अभयानंद, विद्याताई देवरे, परळीचे सरपंच उपसरपंच आदी उपस्थित होते साताऱ्याचे गटशिक्षणाधिकारी यंच्याकडुन परळी शाळेचा गुण गौरव करण्यात आला.

थंड पाण्यासाठी माठ आरोग्यदायी.

Image
 थंड पाण्यासाठी माठ आरोग्यदायी. -------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------- परळी -या वर्षी उन्हाच्या झळा लवकरच सुरु झाल्या, सद्या उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे लोक बाहेरही पडत नाहीत, गार्व्यासाठी थंड पेयाची मागणी वाढत आहे त्यासाठी गरिबांचा फ्रिज असणाऱ्या मातीच्या माठांची मागणी होऊ लागली आहे परंतु मातीची किंमत वाढली असून माठ बनिवणारे कारागीरांची कमतरता आहे त्या मुळे माठाच्या किमती वाढल्या आहेत पर प्रांतातून आलेल्या माठापेक्षा आपल्या माठांची किंमत जास्त आहे परंतु फ्रिज मधील पाण्यापेक्षा पारंपरिक मातीचे माठच फायदेशीर आहे..

शाहूवाडीतील मान येथे गॅस टँकर पलटी झाल्याने गावकऱ्यांच्या भीतीच वातावरण.

Image
शाहूवाडीतील मान येथे गॅस टँकर पलटी झाल्याने गावकऱ्यांच्या भीतीच वातावरण. ------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------ कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शाहूवाडी तालुक्यातील, मान गावानजीक आज पहाटे रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने येणारा गॅसचा टँकर अपघातात पलटी झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. अपघात ठिकाणी शाहूवाडी पोलीस आणि तहसीलदार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत. गॅसने भरलेला टँकर पलटी झाल्याने या अपघात स्थळापासून दोन किलोमीटर परिघातील गावकऱ्यांना प्रशासनाने अन्यत्र हलवले आहे. रत्नागिरीहून अपघातग्रस्त टँकर मधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यासाठी मागवला आहे. या ठिकाणी अपघातग्रस्त टँकर मधील गॅस प्रज्वलित होऊ नये यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त नेमला आहे. अपघात ग्रस्त टँकर मधील मृताची ओळख अजून पटलेली नाही. संबंधिताचा मृतदेह शाहूवाडी आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला आहे. या अपघाताची संबंधित टँकर मालक आणि रत्नागिरीतील गॅस एजन्सी यांच्या अधिकाऱ्यांना शाहूवाडी पोल

दर्शनला हवा आहे मदतीचा हात! तुमची दहा रुपयाची मदत एखाद्याचा प्राण वाचवू शकते!

Image
  दर्शनला हवा आहे मदतीचा हात! तुमची दहा रुपयाची मदत एखाद्याचा प्राण वाचवू शकते! -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र मणेराजुरी प्रतिनिधी राजेंद्र जमदाडे ------------------------------ ही पोस्ट फक्त माणुसकी चे दर्शन घडवणाऱ्या साठी आपल्या जवळील शंभर रुपये मधील दहा रुपये दान करण्यासाठी ही बातमी किंवा पोस्ट फेक किंवा भामटेगिरी साठी नाही एखाद्याच्या आयुष्यात किती वेदनादायी प्रसंग येतो त्यावर आहे कारंदवाडी हाळ तालुका वाळवा येथे राहणाऱ्या कै शहाबाई विलास पाटील व त्यांचा मुलगा कै शहाजी विलास पाटील यांची निधन होऊन फक्त दोनच महिने झाले तोपर्यंत लगेच शहाजीचा मुलगा सध्या दहावी प्रत्येक शिकत असताना दर्शन शहाजी पाटील याला पोटविकाराने अस्टर हॉस्पिटल कोल्हापूर येथे ऍडमिट करण्यात आले त्यामधूनच त्याला रोज ऑक्सिजनची कमतरता भासू लागली व्हेंटिलेटर वर ठेवावे लागणार असे डॉक्टरने सांगितले अचानक झालेल्या शहाजी व त्याच्या आईचे निधनामुळे शहाजीच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळून घरातील होते नव्हते ते सर्व पैसे पाहुणे पै  शेजारी चुलते यांनी केलेली मदत शहाजीच्या वेळेला सर्व दवाखान्यांमध्ये संपल