गवा रेड्याने मारल्या ने फेजिवडे येथील शेतकरी गंभीर जखमी
गवा रेड्याने मारल्या ने फेजिवडे येथील शेतकरी गंभीर जखमी
-----------------------------------------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------------------------------------------
राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथील शेतकरी गणी उस्मान राऊत वय साठ हे आपल्या शेतामध्ये कामानिमित्त गेले असता त्या शेतामध्ये असलेला गवारेडा यांनी शेतकरी गणी राऊत यास धडक देऊन गंभीर जखमी केले गणी राऊत या शेतकऱ्यास राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु जखम मोठी असल्याने त्यास प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे
या परिसरात शेतकऱ्यांना शेतामध्ये जायचं झाले तर जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे तरी वन खात्याने या गवारड्याचा बंदोबस्त करण्यात यावा व गणी राऊत या शेतकऱ्यास गवा रेड्याने मारल्याने त्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई वन खात्याने द्यावी अशी मागणी फेजी वडे येथील शेतकऱ्यांनी केली आहे
Comments
Post a Comment