कुपवाडमध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या निधीतुन विकास कामांचा प्रारंभ.

 कुपवाडमध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या निधीतुन विकास कामांचा प्रारंभ.

-------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------

कुपवाड वार्ड क्रमांक. २ मधील नगरसेवक  गजानन  मगदुम यांच्या पाठपुराव्यातुन कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विकासनिधीतुन व शेखर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली माधवनगर मुख्य रस्तेवरील रुपनर घर ते आमदार शरद पाटील ऑफिसपर्यंतची RCC गटर काम नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन शुभारंभ करण्यात आला सदर रस्तेवरील गटर ग्रामपंचायत काऴापासुन दुर्लक्षीत राहिली होती .

दोन्ही वार्डाच्या सिमेवर असल्याने याकडे कोणाचेच लक्ष नव्हते येथील नगारिक रुपनर, कोल्हापुरे, राजु खोत, अल्ताफ मुजावर, महेश बिरादर यांनी या कामाची मागणी मागणी नगरसेवक गजानन मगदूम यांच्याकडे केले नंतर गजानन मगदूम यांनी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या विकास निधीतून सदर काम करण्याची विनंती सुधीरदादांना यांच्याकडे केली त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी नगर विकास खाते कडून या भागातील रुपनर घर ते आमदार शरद पाटील सर यांच्या ऑफिसपर्यंतची आरसीसी गटर  कामाचा समावेश करून नगरविकास खात्याकडून मा.आम.सुधीर दादा यांनी विशेष निधी देण्यात आला आहे.

 या कामाचा आज शुभारंभ नागरिकांच्या हस्ते नगरसेवक गजानन  मगदुम यांच्या उपस्थितीत करण्यात आला लवकरच सदरची कामे पूर्ण होऊन या कामाचे उद्घाटन माननीय कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ माननीय शेखर इनामदार व अन्य पाहुण्यांचे उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक  गजानन मगदूम यांनी दिली.

 यावेळी भागातील नागरिक राजू खोत, आप्पा रुपनर, भाऊसाहेब पाटील, अभिजीत कोल्हापुरे, महेश बिरादर,  विजय दादा खोत, अरुण तात्या रुपनर, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.