अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे : फडके.

 अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे : फडके.


-------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------

मिरज : अपंगांच्या अनंत अडचणी सोडवण्यासाठी त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी तरुणांनी सक्रिय झाले पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र फडके यांनी व्यक्त केले. ते  शासकीय अपंग शाळा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल अपंग कल्याण  कायदेविषयक प्रशिक्षण उपक्रमात  प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.  

प्रमुख अतिथी  ॲड फारूक कोतवाल  यांनी समाज कल्याण विभाग अंतर्गत शासनाचे विविध योजनेची माहिती दिली.  गाव, शहर स्तरावर जनजागृती करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून  कार्य सुरु आहे‌.  असे सांगितले. अध्यक्षस्थानी सदाशिव मगदूम होते. 

यांनी आपल्या सामाजिक संवेदना जिवंत ठेऊन अपंगांच्या हक्कासाठी   सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अपंगाना न्याय मिळवून देण्याचे काम करूया असे आवाहन केले. या कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे निवृत्त निबंधक श्री. महेश कुलकर्णी उपस्थित होते.

 स्वागत शासकीय अपंग शाळेचे मुख्याध्यापक भारत निकम यांनी केले. प्रास्ताविक विजय कोगनोळे यांनी केले तर आभार रोहीत शिंदे व सूत्रसंचालन  युवराज मगदूम यांनी केले. परशुराम कुंडले, देशमुख, जहिर मुजावर, सॅमसन मोहिते,  शिवाजी दुर्गाडे, ॲड बसवराज होसगौडर, प्रौढ निरंतर केंद्राचे चव्हाण, हेरंब माळी, कोमल मगदूम व अपंग आणि मूकबधिर शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.