सिद्धांत पाटील याची राष्ट्रीय नेटबॉल संघात निवड.

 सिद्धांत पाटील याची राष्ट्रीय नेटबॉल संघात निवड.


--------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------

भारतीय नेटबॉल फेडरेशन व महाराष्ट्र ॲम्युचर नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने  

40 वी सिनीयर राष्ट्रीय नेटबॉल क्रीडा स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथे १ ते ४ मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत,महाराष्ट्र पुरुष व महिला संघ सहभागी होणार असून त्याकरीता महाराष्ट्र संघ निवड चाचणी सराव शिबिर दसरा मैदान भंडारा येथे 19 ते 28 फेब्रूवारी 2023 या दरम्यान घेण्यात आले. या सराव शिबिरात सहभागी खेळाडु मधून महाराष्ट्र पुरुष व महिला संघ निवडण्यात आला यामध्ये सांगली जिल्ह्याचा उत्कृष्ट नेटबॉल खेळाडू सिद्धांत पाटील याची निवड महाराष्ट्र संघात झाली असून

सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्र ॲमेच्युअर नेटबॉल चे अध्यक्ष मा. विपिन भाई कामदार,महासचिव  डॉक्टर ललित जीवनी, सहसचिव मा.श्याम देशमुख,कोषाध्यक्ष मा. डॉ.एस.एन.मुर्ती सांगली जिल्हा नेटबॉल असोसिएशन सचिव मा.एस.एल पाटील सर, अध्यक्ष बाबासो गुंजाटे, कार्याध्यक्ष सम्राट महाडिक,राष्ट्रीय नेटबॉल प्रशिक्षक सुशांत सूर्यवंशी व मोहसीन जमादार यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.