वीज दरवाढ विरोधात जनता दलाच्या वतीने भव्य मोर्चा महावितरणच्या कार्यालयावर काढण्यात आला.

 वीज दरवाढ विरोधात जनता दलाच्या वतीने भव्य मोर्चा महावितरणच्या कार्यालयावर काढण्यात आला.

-----------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-----------------------------

राज्यातील वीजदर कमी करावे या मागणीसाठी आज राधानगरी तालुका जनता वतीने राधानगरी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व कोल्हापूर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी केले

राधानगरी तालुका जनता दलाच्या वतीने वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज राधानगरी बस स्थानकावरून मोर्चा राधानगरी महावितरण कार्यालयावर काढण्यात आला यावेळी वाढीव वीज बिलाची होळी कार्यालयासमोर करण्यात आली यावेळी वीस दरवाढ कमी करावी अशी मागणी करण्यात आली तसेच भाजप सरकारने वीज दरवाढ केल्या बद्दल त्यांचा निषेध करण्यात आला

गुजरात धरतीवर महाराष्ट्रात वीजदर कमी करावी व महाराष्ट्रात सर्वाधिक वीजदर जास्त असल्याने उद्योग व्यवसाय महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे त्यामुळे शासनाने महाराष्ट्रात वीज दर कमी करावेत त्यामुळे महाराष्ट्र बाहेर जाणारे उद्योग थांबवावेत अशी मागणी जनता झाल्याच्या वतीने करण्यात आली 

या मागणीची निवेदन राधानगरी तालुका जनता दलाच्या वतीने राधानगरी येथील महावितरणाचे उप अभियंता गिरीश भोसले व राधानगरीचे नायब तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष वसंतराव पाटील राज्य महासचिव शिवाजीराव परुळेकर शहर जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुकाध्यक्ष विठ्ठल मुसळे शरद पाडळकर बबन पाटील शुभम पाटील सर्जेराव बुगडे प्रकाश पाटील आनंदा वा ग रे सातापा सुतार सचिन बुटके इत्यादी जनता दलाचे कार्यकर्ते हजर होते

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.