दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पूर्ली येथे संपन्न झाला इयत्ता दहावीचा सदिच्छा समारंभ.
दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पूर्ली येथे संपन्न झाला इयत्ता दहावीचा सदिच्छा समारंभ.
----------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------
दिवसमागून दिवस सरले अनेक वर्षे सहज सरलीत दिवस उजाडला निरोपाचा आता सारे काही आठवणीतच उरले, बांधुनी घेऊ जगलेले क्षण सारे गोड मनाशी गाठू सारे उत्तुंग यश शिखरे झेप घेउनी आकाशी.
अशा अनेक भाव भावनांनी आज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचा निरोप घेतला. अध्यक्ष स्थानी शाळेच्या प्राचार्या सौ. मिरा राऊत मॅडम उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना सदिच्छा देताना दहावी सेमी चे वर्गशिक्षक श्री पाटील सर म्हणाले एखादा शिक्षक कडक शिस्तीचा असतो तो कधीच विद्यार्थ्यांचा प्रिय नसतो पण भविष्यात जे विद्यार्थी यशस्वी होतात त्या वेळी मात्र तेच शिक्षक विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आठवतात शिस्तप्रिय विद्यार्थी घडविण्याचे काम सर्व शिक्षक काम करत असतात असे त्यांनी सांगितले तर दहावी इंग्रजी माध्यमाचे वर्ग शिक्षक विजय कांबळे सर यांनी अकरावी आणि बारावी हि दोन वर्षे तुमच्या जीवनातील खडतर बर्षे आहेत यामध्ये यशस्वी झालात तर जिवनात नक्कीच यशस्वी व्हाल असे सांगितले.शाळेच्या प्राचार्या सौ मिरा राऊत मॅडम यांनी हि येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला यशस्वी पणे सामोरे जा आणि शाळेची १००% निकालाची परंपरा कायम ठेवा अशा शुभेच्छा दिल्या. दहावीत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आपली यावेळी मनोगते व्यक्त केलीत. अनेक आठवणींना उजाळा दिला शाळा आणि शिक्षक यांच्या बद्दल भरभरून बोलत होते. यामध्ये जिया मुल्लाणी , वृशाली कुंभार, सानिका काशीद, प्रणाली शेळके, संस्कृती पाटील,निशा शिंदे,वरद भोसले, गणेश नलवडे, आदर्श पाटील या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. नवनाथ चौगले सर व पठाने मॅडम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट म्हणून ग्रिन बोर्ड दिलेत, कुणाल पाटील व प्रणव बोटे यांनी फुलझाडे शाळेला भेट म्हणून दिली. तर नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना भेट म्हणून परीक्षा पॅड दिलेत कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थीनी नेहा चव्हाण व अनुष्का तोरस्कर यांनी केले यासाठी वर्गशिक्षिका पुष्पा गिरिबुवा मॅडम वमाळी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment