जयसिंगपूर पोलिस ठाण्यात फिल्म इंडस्ट्री सुरू होणार ?

जयसिंगपूर पोलिस ठाण्यात फिल्म इंडस्ट्री सुरू होणार ?

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

जयसिंगपूर/प्रतिनिधी 

राहुल कांबळे

----------------------------------

कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिस प्रशासनाचे कर्तव्य असते.सध्या नवनियुक्त झालेल्या सहा.पोलिस निरीक्षक यांनी पोलिस ठाण्यात एक नवीन नियमाची अमल बजावणी करण्याचे आदेश जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. जयसिंगपूर पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाची विचारपूस करण्यात यावी व सदर माणसाचे काम महत्वाचे नसेल तर त्याला पोलिस ठाण्यातून हाकलावून लावण्यात यावे . पण कायदा हा फक्त सर्वसामान्य लोकांसाठी आहे का? .सैराट चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या साठी कायदा वेगळा आहे का ? पोलिस ठाण्याचे प्रभारी पेक्षा जास्त मान हा नागराज मंजुळेचा असलेला आज जयसिंगपूर पोलिस ठाण्यात निदर्शनास आले आहे.

        जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या प्रभरीची खुर्ची नेमकी कुठं गायब झाली ? जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे नवीन प्रभारी आता सैराट चे दिग्दर्शक नागराज मंजुळे असल्याची चर्चा आता जयसिंगपूर शहरात सुरू आहे.

 मा.जिल्हा पोलिस प्रमुख सो.कोल्हापूर यांनी एक आदेश पारित करून पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाची वागणूक द्यावी त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात यावे तसेच तत्काळ फिर्याद दाखल करण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते पण सदरचा आदेश हा गोर - गरिबांसाठी ,सर्वसामान्य यांच्यासाठी नसून हा आदेश केवळ श्रीमंत ,राजकीय पुढारी, मंत्री यांच्यासाठी असल्याचे आज दिसून आले आहे.

 जयसिंगपूर पोलिस ठाण्यात आता पिक्चर तयार होणार का अशी सुदधा चर्चा जयसिंगपूर मध्ये रंगत आहे.


 जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे. जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे प्रभारीची खुर्ची दालनाच्या बाहेर



Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.