गोडोली ते शिवराज पंपयेथील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू.
गोडोली ते शिवराज पंपयेथील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू.
--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
सातारा येथील साईबाबा मंदिर ते शिवराज पंपयेथील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन व नगरपालिका यांचेकडून सुरू करण्यात आली आहे.आजच अतिक्रमण हटाव पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गोडोली जकात नाका ते शिवराज चौकापर्यंत रस्त्यावर व्यावसायिक यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या टपरी व छोटी मोठी दुकाने यांचेवर बुलडोझर फिरवून उद्ध्वस्त केली. कोणतीही कल्पना न देता अचानक मोहीम सुरू केल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले बद्दल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.तर रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे केल्यास अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबवली जाईल असे आश्वासन प्रशासनाने दिले. तर अतिक्रमणे काढल्याने नागरिकांनी धन्यवाद दिले. अनेक वेळा. अतिक्रमणामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता पण आता रस्ता मोकळा झाला आहे. अतिक्रमण काढताना पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तरीही वादावादी झाली. दर शुक्रवारी ही मोहीम राबवली जाणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली.
Comments
Post a Comment