Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिरोळ तहसील कार्यालयासह पोलीस अधिकाऱ्यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन.

 शिरोळ तहसील कार्यालयासह पोलीस अधिकाऱ्यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन.

------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

जयसिंगपुर/प्रतिनिधी

राहुल कांबळे

------------------------------------------

कणेरीमठ येथे सुरू असलेल्या सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव  सोहळ्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या कोल्हापूर येथील इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी भूषण पाटील यांना धक्काबुक्की व मारहाण झाल्याने  संबंधित दोषीवर तात्काळ कारवाई करावी.या प्रमुख मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील सर्व पत्रकाराच्या वतीने शिरोळ तहसील व शिरोळ पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांना शनिवारी निवेदन देण्यात आले.

 दरम्यान,तालुक्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाच्या वतीने शिरोळ येथे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दत्तात्रय बोरीगिड्डे व तहसील कार्यालयाचे अवल कारकून नासिर कोठीवाले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार सुरेश कांबळे, दगडू माने, रमेश सुतार यांनी मनोगतात तीव्र भावना व्यक्त करून पत्रकारावरील हल्ल्याचा निषेध नोंदवला.या आंदोलनामध्ये ज्येष्ठ पत्रकार आनंदा शिंगे, चंद्रकांत भाट , सुरेश कांबळे ,दगडू माने,डी आर पाटील, सतीश पाटील ,रमेश सुतार,बाळासाहेब कांबळे ,दत्तात्रय कदम ,

अविनाश सूर्यवंशी, मदन गावडे, रविराज  ऐवाळे, संदीप अडसूळ, महावीर चिंचणे, संदीप इंगळे, संजय गायकवाड, संतोष तारळे, अजित पवार, नामदेव भोसले, रतन शिकलगार ,डॉ सुभाष सामंत, सयाजी शिंदे ,जमीर मुजावर ,दिलीप कोळी ,संजय सुतार, मोहन पाटील, सुनील इनामदार, खंडेराव हेरवाडे , कुलदीप कुंभार ,गणपती कोळी आदी पत्रकारांनी सहभाग घेतला.

निवेदनात म्हटले आहे की, कनेरी मठ लोकोत्सव कार्यक्रमांमध्ये गाईंचा मृत्यू  ही वास्तव घटनेचे कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या प्रतिनिधीला धक्काबुक्की ,मारहाण आणि धमकावणे असा प्रकार  करणाऱ्या जबाबदार घटकावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा जिल्हा पातळीवर तीव्र आंदोलन झेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments