रुग्ण सलाईन वर, नातेवाईक रस्त्यावर,; धक्कादायक वास्तव.

 रुग्ण सलाईन वर, नातेवाईक रस्त्यावर,; धक्कादायक वास्तव.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

पुंडलिकराव देशमुख

अमरावती विशेष प्रतिनिधी

--------------------------------------

जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात रुग्णालयाचे मुख्य त्यांचे गेट अर्धे लावलेले शेजारी सुरक्षा रक्षक बसलेले होते रात्री बाराची वेळ होती गेटच्या आत मध्ये रात्री ९ नंतर कुठल्याच पुरुषाला प्रवेश नसल्याने आता भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरच थांबावा लागते आत असलेल्या रुग्णासोबत एका महिलेला थांबण्याची परवानगी आहे त्यामुळे सोबत असलेले पुरुष मुख्य इमारती समोरच असलेल्या टिनाचे शेड असलेल्या खुल्या जागेवर झोपलेले रुग्णांचे नातेवाईक काही मुख्य द्वाराच्या बाजूला झोपलेले नातेवाईक बाहेर गावावरून प्रसूती करता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय दिवसा आणि रात्रीही थांबण्याच्या जेवणासाठी च्या सुविधा अपुऱ्या त्यामुळे नातेवाईकांची गरज होत असल्याचे दैनिक सुपर भारत ने प्रत्यक्ष जाऊन केलेल्या पाहणीत आढळले सोबतच पार्किंग परिसरात अनेक जण संशयस्पद स्थितीत फिरताना आढळून आले त्याला कोणीही अटकण्याची दिसून आले नाही जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय आहे सर्वच आजाराच्या रुग्णावर येथे उपचार होतात त्यामुळे सामान्यासाठी हे रुग्णालय मोठे आधार आहे मात्र त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी मात्र सुविधा अपुरी पडल्याचे दिसून आले रुग्णासोबत एकच नातेवाईक पाहिजे! उपचार घेत असलेल्या रुग्णासोबत एक नातेवाईक थांबण्यास परवानगी आहे रात्रीच्या वेळी एक नातेवाईक रुग्णांसोबत असतो त्याच्यासोबत ते रात्री आराम करू शकते जास्त नातेवाईक असतील तर त्यांना बाहेरील निवाऱ्यामध्ये थांबावा लागते जिल्हा सामान्य रुग्णालयातील डोळ्याच्या ऑपरेशन थेटर मध्ये रुग्णांच्या नातेवाईका करता दुपारी जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली मात्र या ठिकाणी नादुरुस्त असलेले बेड ठेवण्यात आल्याने अनेकांना तेथे रात्री आराम करण्यासाठी ची जागा अपुरी असल्याने अनेकजण वाट समोरच झोपत असल्याचे दिसून आले त्यामुळे सीसीटीव्ही कशाला लावली असा प्रश्न निर्माण झाला? रुग्णालय परिसरात प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत मात्र तरीही परिसरात अनेक वेळा नातेवाईकांच्या मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा अनेकांचा अनुभव आला आहे जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात रुग्णाच्या सोबत असलेल्या पुरुष मंडळींना दिनाच्या शेडमध्ये दुर्गंधीयुक्त असलेल्या जागेतच आपली रात्र काढावी लागतो रात्रीच्या वेळी रुग्णाला अडचण निर्माण झाल्यास पुरुष मंडळी त्या ठिकाणी असतात जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात लहान मुलांच्या थॅलेसेमिया कक्षआहे. त्या ठिकाणी लहान मुले उपचार घेत आहे त्यांच्यासोबत फक्त एकालाच राहण्याची मुभा असल्याने बाकी लोकांना वार्डासमोर असलेल्या जागेत आपली रात्र काढावी लागतो. रुग्णासोबत रात्रीच्या वेळी एक जण थांबण्याची परवानगी आहे मात्र एकापेक्षा जास्त लोकांना थांबता येणार नाही रुग्णालयाच्या इमारती जुन्या आहेत इतर कुठेही जागा नाही त्यामुळे ते शक्य नाही नवीन जिल्हास्तरी रुग्णालयाच्या इमारतीमध्ये रुग्णांच्या राणीची व्यवस्था करण्यात यावी असे रुग्णांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.