Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जयसिंगपूर मधून तिसरा डोळा गायबभुरटे चोर पकडण्यास जयसिंगपूर पोलिस हतबल.

 जयसिंगपूर मधून तिसरा डोळा गायब भुरटे चोर पकडण्यास जयसिंगपूर पोलिस हतबल.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

जयसिंगपूर/प्रतिनिधी 

 राहुल कांबळे

-------------------------------------

काही दिवसांपासून जयसिंगपूर मध्ये भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे.मागील आठवड्यात दोन महिलेच्या बाबतीत  हिसडा मारून सोने लंपास केलेली घटना

घडली आहे.पण अद्याप भुरट्या चोराचा काही पत्ता जयसिंगपूर पोलिस ठाण्याला लागत नाही मग जयसिंगपूर पोलिस ठाणे चोराचा शोध घेण्याऐवजी नेमकं कश्यात मग्न आहेत याची वरिष्ठांनी चौकशी करण्याची सध्या गरज आहे. जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक यांनी जयसिंगपूर मध्ये पदभार स्वीकारून तेवीस दिवस झाले.तर या तेवीस दिवसात जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल संख्या कमी झाली आहे.याबाबत जयसिंगपूर शहरातील काही नागरिक मात्र आनंदित आहे पण काही नागरिकांच्या मनात मात्र नाराजगी दिसून येत आहे.पोलिस ठाण्यात आता न्यायालय सुरू केलेल्यांची चर्चा नगिरिकातून होताना दिसत आहे..

 जयसिंगपूर शहरात लोकवर्गणीतून काही ठराविक ठिकाणी सी.सी.टी.वी बसवण्यात आले होते व त्याचे थेट चित्रीकरण  जयसिंगपूर पोलिस ठाण्यात करण्यात आले होते.तर भुरट्या चोरांनी ते सी.सी.टी.वी च गायब करून चोरी करण्याचा मार्गच मोकळा करून टाकला आहे.सध्या या भुरट्या चोरांनी धुमाकूळ  घातल्यामुळे सुरवातीला सीसीटीव्ही चा शोध घेऊन सीसीटीव्ही बसवून घेण्याची गरज असलेली दिसत.त्यामुळे कदाचित पोलिस यंत्रेनाला सुद्धा मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments