सातारा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे थेट सोडत संपन्न.
सातारा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे थेट सोडत संपन्न.
-----------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------
सातारा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे वतीने सन २०२२/२३ करिता आत सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापक राजीव चव्हाण, समाजकल्याण विभागाचे कोकरे, पुणे समाजकल्याण विभागाचे किरण संकट, जयवंत वायदंडे यांच्या उपस्थितीत थेट कर्ज वाटप सोडत काढण्यात आली.सदर योजनेसाठी एकुण १२६ अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यातून ३७ अर्ज महिला व८९ अर्ज पुरूष या मधूनच पन्नास टक्के महिला व पन्नास टक्के पुरुष असे ३२ महिला व ३३ पुरूष अर्ज सोडत काढण्यात आली. सदर प्रसंगी लाभार्थी व पत्रकार , अधिकारी हजर होते. संपुर्ण प्रकिया पारदर्शकता यावी म्हणून विडीओ शुटिंग करणेत आले. पारदर्शक प्रकिया राबविण्यात आल्याने लाभार्थी यांनी शासनास धन्यवाद दिले.
Comments
Post a Comment