पीडित तक्रारदार मुलीची तातडीने दखल-अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची तत्परता.
पीडित तक्रारदार मुलीची तातडीने दखल-अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची तत्परता.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
सांगली : विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे दक्षता समिती व शांतता समितीच्या बैठकीमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन केले व ओळखपत्र ,परिसरातील चोऱ्या, चेन स्नेचिंग, चोरीचे मुद्देमाल परत करण्याची प्रक्रिया, समितीच्या सदस्यांची जबाबदारी व कर्तव्य आदी विषयावर चर्चा केली.
. तसेच समितीच्या बैठकीदरम्यान पीडित तक्रारदार मुलीची तातडीने दखल घेऊन कार्यवाहीचे आदेश दिले. दलाल यांच्या कार्यपद्धती व तत्परतेबद्दल सदस्यांनी अभिनंदन करून आभार मानले.
मीटिंग चे स्वागत व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले. याप्रसंगी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, डॉ. संजय पाटील, शहाजी भोसले, शेवंता वाघमारे, संगीता शिंदे, प्रा. तोहीद शेख, छाया सर्वदे, अनिल शेटे, उत्तम कांबळे, राजेश साळुंखे, माधव घोरपडे उपस्थित होते. आभार कॉन्स्टेबल संजय मोटे यांनी मानले.
Comments
Post a Comment