Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापुरच्या उत्पादनाला जागतिक नकाशावर आणण्यासाठी सहकार्य.

 कोल्हापुरच्या उत्पादनाला जागतिक नकाशावर आणण्यासाठी सहकार्य.

--------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------

शिरोली   : कोल्हापूरच्या उत्पादनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे मत अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाचे आंतरराष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी रॉब अँडरसन यांनी व्यक्त केले. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( स्मॅक ) च्या स्वच्छ तंत्रज्ञान आणि ऊर्जा कार्यक्षमता प्रणाली या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. स्मॅकचे अध्यक्ष दिपक पाटील हे अध्यक्षस्थानी होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अनिल वेल्दे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, अमेरिकन दुतावासाच्या सार्वजनिक सहभाग विशेषज्ञ अमृता डिमेल्लो, स्मॅक उपाध्यक्ष एम. वाय. पाटील, स्किल ट्रेड प्रमोशन समितीचे अमर जाधव हे प्रमुख उपस्थितीत होते.

श्री. अँडरसन यांनी, अमेरिकन दूतावासा कडून एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच फाऊंड्रीमधील ऊर्जा कार्यक्षमतेचे तंत्रज्ञान हस्तांतरणास मदत केली जाईल असे सांगितले. अमेरिकेमधील गुंतवणूकदार पर्यावरण धोरणासाठी गुंतवणूक करत आहेत. त्यांच्याकडून काम मिळवण्यासाठी येथील उद्योगांना उत्सर्जन कमी करावे लागेल. यामध्ये भारत अजूनही स्पर्धात्मक आहे. पण पुढे झेप घेऊ शकेल. भारतीय विद्यापीठांमध्ये मनुष्यबळ कौशल्य पर्यावरण शिक्षण देण्यात येते. भारतातील अभियांत्रिकी शिक्षणाने चायनाला मागे टाकले असून सर्वाधिक विद्यार्थी अमेरिकेमध्ये आहेत. गेल्या वर्षी अमेरिकन दूतावासामधून २०,००० भारतीयांना विजा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अनिल वेल्दे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, अमर जाधव, सचिन पाटील, विरेंद्र पाटील, रविंद्र सणगर यांनी मार्गदर्शन केले. 

स्मॅकचे खाजनिस जयदीप चौगले, आयटीआयचे अध्यक्ष राजू पाटील, स्मॅक फाउंड्री क्लस्टरचे अध्यक्ष  नीरज झंवर, अतुल पाटील, भरत जाधव, प्रशांत शेळके, जयदत्त जोशीलकर, सीआयएफ पश्चिम विभागाचे अध्यक्ष रवी डोली, उद्योजक नामदेव पाटील, अविनाश चिकणीस, , प्रवीण पाटील, शेखर कुसाळे, बदाम पाटील, संजय भगत आदी उपस्थित होते.

शिरोली : स्मॅक येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना राॅब अँडरसन, शेजारी अमर जाधव, एम. वाय. पाटील, दिपक पाटील, डॉ. कादंबरी बलकवडे, सतीश शेळके व अनिल वेल्दे

Post a Comment

0 Comments