‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ.पाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यक-सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज.
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ...पाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यक-सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज.
-----------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
दिल्ली, 26 फेब्रुवारी, 2023 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या शुभहस्ते आज सकाळी 8.00 वाजता ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ यमुना नदीच्या छट घाटावर (आय.टी.ओ.) येथून करण्यात आला.
याबरोबरच देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासकीय प्रदेशांतील 730 शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले.
बाबा हरदेवसिंहजी यांच्या शिकवणूकीतून प्रेरणा घेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य निर्देशनानुसार या ‘अमृत परियोजने’चे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी संत निरंकारी मिशनचे समस्त अधिकारीगण, केन्द्रीय एवं राज्य सरकारमधील मंत्री, मान्यवर अतिथि तसेच हजारोंच्या संख्येने निरंकारी स्वयंसेवक आणि सेवादलचे सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मिशनच्या वेबसाईटवरुन करण्यात आले ज्याचा लाभ देशविदेशातील निरंकारी भक्तगणांनी घेतला.
इस परियोजनेचा शुभारंभ करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी पाण्याचे अनन्यसाधारण महत्व समजावून सांगितले तसेच ईश्वराने आपल्याला हे अमृतरुपी जल दिले आहे त्याचा निर्मळ स्वरुपात सांभाळ करणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे सांगितले. पाणी निर्मळ होण्याबरोबरच मनेही निर्मळ होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करुन सद्गुरु माताजी म्हणाल्या, की आपण संतांसारखे जीवन जगून परोपकाराचे कार्य करत राहायचे आहे.
संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजाजी यांची विस्तृत जानकारी दिली.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देशभरातील विविध जलाशयांच्या बाबतीत देण्यात आलेल्या निर्देशांचे यथोचित पालन करण्यात आले. यामध्ये रेड झोन सर्वांसाठी पूर्णपणे वर्जित ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य स्थळ यलो झोन होता तर ग्रीन झोनमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव महिला व बालकांना प्रवेश देण्यात आला होता.
या अभियान अंतर्गत सांगलीमध्ये कृष्णा नदी माई घाट आयुर्वीन फुल सर्व परिसरातील व नदीकाठावरील पाण्यातील प्लास्टिक कचरा, निरोपयोगी पदार्थ, कपडे ,काटेरी झुडपे,व पुरावेडे पाहत आलेले झाड हे मोठ्या दोरीच्या साह्याने पाण्यातून बाहेर काढण्यात आले.आणि सर्व कचरा एकत्रित गोळा केला. या ठिकाणी सांगली ,मिरज आणी कुपवाड महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ.उर्मिला बेलवणकर या उपस्थितांसमोर बोलताना म्हणाल्या. संत निरंकारी मंडळातर्फे हा अतिशय सुंदर उपक्रम राबविला आहे. त्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे. मी या कार्यक्रमास पहिल्यांदाच उपस्थित आहे. तरी यापुढे आपणास कोणतीही मदत लागल्यास मला हक्काने सांगा ती मी पूर्ण करीन.
या परियोजनेमध्ये जास्तीत जास्तीत युवावर्गाचा सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमामध्ये केवळ पर्यावरणपूरक उपकरणांचाच वापर करण्यात आला. प्लास्टिक बॉटल किंवा थर्माकॉल इत्यादिंच्या वस्तू पूर्णपणे प्रतिबंधित होत्या.
या कार्यक्रमाचे नियोजन सांगली सेक्टर अधिकारी व सेवादल अधिकारी व सर्व सेक्टर मधील भक्तगण यांनी केले .
Comments
Post a Comment