Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पाटणे फाटा येथे चक्काजाम आंदोलन.

 स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पाटणे फाटा येथे चक्काजाम आंदोलन.

-------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------

चंदगड : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पाटणे फाटा येथे मंगळवारी (दि.२२ फेब्रुवारी २०२३ रोजी) चक्काजाम आंदोलन झाले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना पन्नास हजार कर्ज माफीचे हप्ते वाढीव वीजदर मिळावे, शेतीपंपाचे वाढीव प्रस्तावित, ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी लूट, कापूस थकीत, ऊसाची एफआरपी, मका पीकविमा, अतिवृष्टीची भरपाई तसेच प्रोत्साहन पर अनुरानाची थकीत रक्कम आदी प्रश्नासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी चंदगड पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पोलिस संरक्षण देण्यात आले होते. रास्तारोको आंदोलन केले त्यानंतर प्रा. दिपक पाटील व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


या आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.दिपक पाटील यांच्यासह विश्वनाथ पाटील, गजानन राजगोळकर, बी.एम.पाटील, के.जी.पाटील, सागर दळवी, गुंडू कंग्राळकर, सिद्धाप्पा पाटील, स्वाभिमानीचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments