जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाने सराईत चोरट्यास 3 लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालासह घेतले ताब्यात.
जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाने सराईत चोरट्यास 3 लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालासह घेतले ताब्यात.
-------------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
जयसिंगपुर/प्रतिनिधी
राहुल कांबळे
---------------------------------------------
जयसिंगपूर शहरा लगतच असणाऱ्या संभाजीपूर येथून दारात उभी केलेली ह्युंडई आय 20 कार अज्ञात चोरट्याने बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी सायंकाळी सव्वा सात च्या सुमारास चोरून नेले असलेची फिर्याद विराजित अशोक अंदरघिसके व.व.23 यांनी जयसिंपूर पोलीसांत दिली होती.याबाबत मिळालेली माहिती अशी की यातील फिर्यादी यांनी आपला लॅपटॉप घरात ठेवण्यासाठी चारचाकी गाडीची किल्ली गाडीलाच लावून घरात गेले होते. घरात लॅपटॉप ठेवून परत आले असता दारात उभी केलेली 3 लाख रुपये किंमतीची आय 20 गाडी काही क्षणात कोणीतरी चोरून नेली असलेचे निदर्शनास येताच सदर घटनेची माहिती फिर्यादीने जयसिंपूर पोलिसांना दिली.यावेळी सोशल मिडियावर गाडीचा फोटो आणि माहिती व्हायरल करण्यात आली. त्याअनुषंगाने पोलिस पेट्रोलिंग करत असताना उमळवाड येथील सतीश रामा हेगडे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे माहिती प्राप्त करून फिर्यादीने दिलेल्या वर्णनाची गाडी आरोपी यास जयसिंगपूर रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेऊन संशयित आरोपी महेश शिवाजी बाबर वय 46 राहणार किकली ता.वाई जिल्हा सातारा याचे कडे अधिक चौकशी केली असता यापूर्वी अहमदनगर,सातारा,पुणे पिंपरी चिंचवड,सासवड, सांगली पोलीस ठाण्यात घरफोडी आर्म एक्ट,चोरी अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असलेचे निष्पन्न झाले.संशयित आरोपी वर 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता मा.न्यायाधीशसो यांनी 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई जिल्हा अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलिस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील तासेच उपविभागीय पोलिस अधीक्षक जयसिंगपूर रामेश्वर वैंजने यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक संजय देशमुख हेड कॉन्स्टेबल स्मिता कांबळे ,पो.ना. भातमारे,पो.कॉ.रोहित डावाळे,संदेश शेटे,अमोल अवघडे ,वैभव सूर्यवंशी यांनी केली आहे.
Comments
Post a Comment