जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई27मोटारसायकलीसह तीन आरोपी जेरबंद.

 जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई27मोटारसायकलीसह तीन आरोपी जेरबंद.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

जयसिंगपूर प्रतिनिधी 

नामदेव भोसले

-------------------------------

वर्षभरापासून मोटरसायकल चोरून विक्री करून थैमान घालत असलेल्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मल्लिकार्जुन कल्लाप्पा म्हेत्री  वय 31 राहणार सांगली या प्रमुख आरोपीसह अंबादास श्रीमंत  बबलाद वय 30 जत असिफ अकबर मुजावर वय 24 बिसूर अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सहा लाख 65 हजार रुपये किमतीच्या 27 मोटरसायकली जप्त केल्या आहेत .

 जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाला यश आले आहे

संबंधित आरोपी हे मागणी तसा पुरवठा या न्यायाने कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातून मोटर सायकलची चोरी करून कमी किमतीत विकत होते आरोपी मल्लिकार्जुन म्हेत्री

 हा जयसिंगपूर मध्ये विना प्लेटची गाडी चालवत असताना होमगार्ड अक्षय बेडकर याला संशय आल्याने त्याने कसून चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली. यावेळी पेट्रोलिंग पथकास माहिती देऊन त्याच्याकडे चौकशी असताना संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन खाक्या दाखवून चौकशी केली असता त्याने जयसिंगपूर एसटी स्टँड मधून चोरून नेल्याची कबुली दिली पोलिसांनी कौशल्यपूर्णरित्या तपास केला असता आणखीन दोन सहकाऱ्यांच्या मदतीने आपण कोल्हापूर सांगली जिल्हा तसेच कर्नाटक राज्यातील अथणी विजयपूर आदी भागातून आतापर्यंत सत्तावीस मोटरसायकली चोरल्याचेकबूल केले त्या अनुषंगाने जयसिंगपूर पोलिसांनी मोटरसायकली ताब्यात घेतले आहेत

मोटर सायकलची चोरी झाल्याचे गुन्हे जयसिंगपूर गाव भाग सांगली शिवाजीनगर पोलीस ठाणे कवठेमंकाळ मिरज ग्रामीण महात्मा गांधी पोलीस ठाणे विश्रामबाग आष्टा तसेच कर्नाटक राज्यातील अथणी ए पी ए पी एमसी पोलीस ठाणे आदर्श नगर गांधी चौक आधी पोलीस ठाण्यात मोटर सायकल चोरीची फिर्यादी नोंद आहे

याबाबत माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक खाटमोडे पाटील म्हणाले जयसिंगपूर पोलिसांनी जिल्ह्यात फार मोठी कामगिरी केली असून 27 चोरीस गेलेल्या मोटरसायकलीसह आरोपींना अटक केली आहे याबाबत सर्व टीमचे कौतुक असून आरोपींसह चोरीची मोटर सायकल विकत घेतलेल्या यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले चोरीस गेलेला मोटरसायकल मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच मोटरसायकल असून सांगली जिल्ह्यातील दहा तर कर्नाटकातील नऊ ठिकाणी मोटरसायकल चोरी स गेल्याची नोंद आहे तर विजयपूर कर्नाटक येथून चोरीस गेलेल्या तीन मोटर सायकलची नोंद नाही

जयसिंगपूर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील निलेश मांजरे स्मिता कांबळे अंजना बनणे अभिजीत भातमारे संदेश शेटे रोहित ढवळे अमोल अवघडे वैभव सूर्यवंशी मंगेश पाटील हे सदर कारवाईत सहभागी होते

जयसिंगपूर पोलीस ठाणे  गुन्हे शोध पथकातील मोटारसायकल चोरट्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे पोलीस काँन्टेबल  रोहित डावाळे,अमोल  अवघडे,संदेश शेटे,वैभव सुर्यवंशी,अभिजीत भातमारे मंगेश पाटील यांचे पथकाने धडाकेबाज कारवाई केली...

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.