1 लाख 75 हजारांची लाच स्विकारताना शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,कनिष्ठ अभियंता,लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

 1 लाख 75 हजारांची लाच स्विकारताना शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,कनिष्ठ अभियंता,लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

----------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

राहुल कांबळे

जयसिंगपुर/प्रतिनिधी

----------------------------------------------

बांधकाम परवाना फाईल तपासुन पुढे पाठवणे करीता खाजगी इसमाकडून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची लाच स्विकारले प्रकरणी शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि लिपिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून ताब्यात घेतले.या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरोळ नगपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत मारुती हराळे व.व.33

सद्या रा.शिरोळ, जि. कोल्हापूर,मुळ भिलवडी ता.पलूस,जि.सांगली,कनिष्ठ अभियंता संकेत हणमंत हंगरगेकर व.व. 28 सद्या रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ मूळ रा.उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद,शिरोळ नगरपरिषदेचे लिपिक सचिन तुकाराम सावंत राहणार शिरोळ जिल्हा कोल्हापूर तसेच खाजगी इसम अमित तानाजी संकपाळ व.व.42 राहणार शिरोळ जिल्हा कोल्हापूर अशी संशयित आरोपींची नावे आहेत. 

बांधकाम परवाना फाईल तपासुन पुढे पाठवणेकरीता तक्रारदाराकडून संकेत हंगेरीकर व  सचिन सावंत यांनी 1 लाख रुपये तर तक्रारदाराची फाईल मंजूर करून बांधकाम परवाना देणेसाठी मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी 75 हजार रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच खासगी इसम अमित संकपाळ याचेकरवी  स्वीकारताना सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले.सदरची कारवाई पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोसई संजीव बंबरगेकर, पोहेकॉ  विकास माने, पोकॉ मयूर देसाई, रुपेश माने, विष्णू गुरव यांच्या पथकाने.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.