Posts

Showing posts from February, 2023

1 लाख 75 हजारांची लाच स्विकारताना शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,कनिष्ठ अभियंता,लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

Image
  1 लाख 75 हजारांची लाच स्विकारताना शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,कनिष्ठ अभियंता,लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. ---------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र राहुल कांबळे जयसिंगपुर/प्रतिनिधी ---------------------------------------------- बांधकाम परवाना फाईल तपासुन पुढे पाठवणे करीता खाजगी इसमाकडून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची लाच स्विकारले प्रकरणी शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि लिपिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून ताब्यात घेतले.या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरोळ नगपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत मारुती हराळे व.व.33 सद्या रा.शिरोळ, जि. कोल्हापूर,मुळ भिलवडी ता.पलूस,जि.सांगली,कनिष्ठ अभियंता संकेत हणमंत हंगरगेकर व.व. 28 सद्या रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ मूळ रा.उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद,शिरोळ नगरपरिषदेचे लिपिक सचिन तुकाराम सावंत राहणार शिरोळ जिल्हा कोल्हापूर तसेच खाजगी इसम अमित तानाजी संकपाळ व.व.42 राहणार शिरोळ जिल्हा कोल्हापूर अशी संशयित आरोपींची नावे आहेत.  बांधकाम परवाना फाईल तपासुन

जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई27मोटारसायकलीसह तीन आरोपी जेरबंद.

Image
 जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई27मोटारसायकलीसह तीन आरोपी जेरबंद. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  जयसिंगपूर प्रतिनिधी  नामदेव भोसले ------------------------------- वर्षभरापासून मोटरसायकल चोरून विक्री करून थैमान घालत असलेल्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मल्लिकार्जुन कल्लाप्पा म्हेत्री  वय 31 राहणार सांगली या प्रमुख आरोपीसह अंबादास श्रीमंत  बबलाद वय 30 जत असिफ अकबर मुजावर वय 24 बिसूर अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सहा लाख 65 हजार रुपये किमतीच्या 27 मोटरसायकली जप्त केल्या आहेत .  जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाला यश आले आहे संबंधित आरोपी हे मागणी तसा पुरवठा या न्यायाने कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातून मोटर सायकलची चोरी करून कमी किमतीत विकत होते आरोपी मल्लिकार्जुन म्हेत्री  हा जयसिंगपूर मध्ये विना प्लेटची गाडी चालवत असताना होमगार्ड अक्षय बेडकर याला संशय आल्याने त्याने कसून चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली. यावेळी पेट्रोलिंग पथकास माहिती देऊन त्याच्याकडे चौकशी असताना संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन खाक्या द

1 लाख 75 हजारांची लाच स्विकारताना शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,कनिष्ठ अभियंता,लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

Image
 1 लाख 75 हजारांची लाच स्विकारताना शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,कनिष्ठ अभियंता,लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. ---------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र राहुल कांबळे जयसिंगपुर/प्रतिनिधी ---------------------------------------------- बांधकाम परवाना फाईल तपासुन पुढे पाठवणे करीता खाजगी इसमाकडून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची लाच स्विकारले प्रकरणी शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि लिपिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून ताब्यात घेतले.या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरोळ नगपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत मारुती हराळे व.व.33 सद्या रा.शिरोळ, जि. कोल्हापूर,मुळ भिलवडी ता.पलूस,जि.सांगली,कनिष्ठ अभियंता संकेत हणमंत हंगरगेकर व.व. 28 सद्या रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ मूळ रा.उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद,शिरोळ नगरपरिषदेचे लिपिक सचिन तुकाराम सावंत राहणार शिरोळ जिल्हा कोल्हापूर तसेच खाजगी इसम अमित तानाजी संकपाळ व.व.42 राहणार शिरोळ जिल्हा कोल्हापूर अशी संशयित आरोपींची नावे आहेत.  बांधकाम परवाना फाईल तपासुन

वीज दरवाढ विरोधात जनता दलाच्या वतीने भव्य मोर्चा महावितरणच्या कार्यालयावर काढण्यात आला.

Image
 वीज दरवाढ विरोधात जनता दलाच्या वतीने भव्य मोर्चा महावितरणच्या कार्यालयावर काढण्यात आला. ----------------------------- राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ----------------------------- राज्यातील वीजदर कमी करावे या मागणीसाठी आज राधानगरी तालुका जनता वतीने राधानगरी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व कोल्हापूर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी केले राधानगरी तालुका जनता दलाच्या वतीने वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज राधानगरी बस स्थानकावरून मोर्चा राधानगरी महावितरण कार्यालयावर काढण्यात आला यावेळी वाढीव वीज बिलाची होळी कार्यालयासमोर करण्यात आली यावेळी वीस दरवाढ कमी करावी अशी मागणी करण्यात आली तसेच भाजप सरकारने वीज दरवाढ केल्या बद्दल त्यांचा निषेध करण्यात आला गुजरात धरतीवर महाराष्ट्रात वीजदर कमी करावी व महाराष्ट्रात सर्वाधिक वीजदर जास्त असल्याने उद्योग व्यवसाय महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे त्यामुळे शासनाने महाराष्ट्रात वीज दर कमी करावेत त्यामुळे महाराष्ट्र बाहेर जाणारे उद्योग थांबवावेत अशी मागणी जनता झाल्याच्या वतीने करण्यात आली  या मागणीची निवेदन राधानगर

सिद्धांत पाटील याची राष्ट्रीय नेटबॉल संघात निवड.

Image
 सिद्धांत पाटील याची राष्ट्रीय नेटबॉल संघात निवड. -------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------- भारतीय नेटबॉल फेडरेशन व महाराष्ट्र ॲम्युचर नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने   40 वी सिनीयर राष्ट्रीय नेटबॉल क्रीडा स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथे १ ते ४ मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत,महाराष्ट्र पुरुष व महिला संघ सहभागी होणार असून त्याकरीता महाराष्ट्र संघ निवड चाचणी सराव शिबिर दसरा मैदान भंडारा येथे 19 ते 28 फेब्रूवारी 2023 या दरम्यान घेण्यात आले. या सराव शिबिरात सहभागी खेळाडु मधून महाराष्ट्र पुरुष व महिला संघ निवडण्यात आला यामध्ये सांगली जिल्ह्याचा उत्कृष्ट नेटबॉल खेळाडू सिद्धांत पाटील याची निवड महाराष्ट्र संघात झाली असून सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्र ॲमेच्युअर नेटबॉल चे अध्यक्ष मा. विपिन भाई कामदार,महासचिव  डॉक्टर ललित जीवनी, सहसचिव मा.श्याम देशमुख,कोषाध्यक्ष मा. डॉ.एस.एन.मुर्ती सांगली जिल्हा नेटबॉ

‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ.पाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यक-सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज.

Image
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ.. . पाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यक-सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज. ----------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------ दिल्ली, 26 फेब्रुवारी, 2023 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या शुभहस्ते आज सकाळी 8.00 वाजता ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ यमुना नदीच्या छट घाटावर (आय.टी.ओ.) येथून करण्यात आला.   याबरोबरच देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासकीय प्रदेशांतील 730 शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले.    बाबा हरदेवसिंहजी यांच्या शिकवणूकीतून प्रेरणा घेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य निर्देशनानुसार या ‘अमृत परियोजने’चे आयोजन करण्यात आले.   याप्रसंगी संत निरंकारी मिशनचे समस्त अधिकारीगण, केन्द्रीय एवं राज्य सरकारमधील मंत्री, मान्यवर अतिथि तसेच हजारोंच्या संख्येने निरंकारी

पर्यटन महामंडळा च्या फंडातून तीस लाखं खर्च करून बांधण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट ला तडा.

Image
   पर्यटन महामंडळा च्या फंडातून तीस लाखं खर्च करून बांधण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट ला तडा. --------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र राधानगरी   प्रतिनिधी  विजय बकरे --------------------------------------- राधानगरी अभयारण्यात क्षेत्रा मध्ये येत असलेल्या मांजर खिंड येथे पर्यटन विकास महामंडळातून फंडातून तीस लाख रुपये खर्च करून सेल्फी  पॉईंटचे निष्कृष्ट दर्जाचे काम केल्याने त्याला तडा गेला असल्याने त्या कामाची चौकशी करण्यात यावी  अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील सांगावकर यांनी केले आहे. राधानगरी अभयारण्य क्षेत्रामध्ये मांजरखंड येथे पर्यटन विकास महामंडळातून 30 लाख रुपये खर्च करूनबांधण्यात आलेल्या. या सेल्फी पॉईंट चे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री उदय सामंत येणार असल्याने त्या सेल्फी पॉइंट चे काम दोन दिवसात पुरा करून घाईगडबडीने उद्घाटन आमदार यांनी करून मोठेपणा मिळवला पण सेल्फी पॉइंट काम एक वर्षाच्या आत निष्कृष्ट दर्जाचे झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून दिसूनआले आहे  कामाचे चौकशी करण्यात यावी अशी मागणी पर्यटकांकडून व सामाजिक कार्यकर्ते सुनील सांगावकर यांनी केले आहे

नेहरू युवा केंद्र कोल्हापूर व उर्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खुपीरे गावामध्ये 26-28 फेब्रुवारी असे तीन दिवसीय श्रमदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होत आहे.

Image
 नेहरू युवा केंद्र कोल्हापूर व उर्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खुपीरे गावामध्ये 26-28 फेब्रुवारी असे तीन दिवसीय श्रमदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होत आहे. -------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------- शिबिरामध्ये स्वछता, वृक्षारोपण तसेच सर्वांच्या सहकार्यातून शाळेतील मुतारी ची डागडुजी व रंगकाम करण्यात येणार आहे.आज विद्यामंदिर खुपीरे येथे कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद कोल्हापूर चे माजी अध्यक्ष श्री राहुल पाटील,ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,नेहरू युवा केंद्राचे अमित हुजरे, गणेश भोसले, नितीन भोसले तसेच उर्मी संस्थेचे सदस्य सुमित हुजरे, धनाजी हुजरे, संदीप पाटील नलवडे, लखन गुरव, अक्षय पाटील तसेच गावातील युवक वर्गाचा सहभागी होते. माननीय राहुल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण ला सुरुवात झाली. सदर कार्यक्रमासाठी गावातील युवकांचा चांगला सहभाग मिळाला. सामाईक प्रयत्नांनातून अशीच भरीव कामगिरीची आणि मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

गोडोली ते शिवराज पंप‌येथील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू.

Image
 गोडोली ते शिवराज पंप‌येथील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू. -------------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------------- सातारा येथील साईबाबा मंदिर ते शिवराज पंप‌येथील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन व नगरपालिका यांचेकडून सुरू करण्यात आली आहे.आजच अतिक्रमण हटाव पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गोडोली जकात नाका ते शिवराज चौकापर्यंत  रस्त्यावर व्यावसायिक यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या टपरी व छोटी मोठी दुकाने यांचेवर‌ बुलडोझर फिरवून  उद्ध्वस्त केली. कोणतीही कल्पना न देता  अचानक मोहीम सुरू केल्याने ‌मोठया प्रमाणात नुकसान झाले बद्दल ‌ व्यावसायिकांनी ‌नाराजी व्यक्त केली.तर रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे केल्यास अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबवली जाईल असे आश्वासन   प्रशासनाने दिले. तर अतिक्रमणे काढल्याने नागरिकांनी धन्यवाद दिले. अनेक वेळा. अतिक्रमणामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता पण आता रस्ता मोकळा झाला आहे. अतिक्रमण काढताना पोलिस बंदोबस्त ठ

गाडगेबाबांनी आपल्या कृतीशील कार्यातून समाजवादी विचारांची पेरणी केली-प्रसाद कुलकर्णी.

Image
 गाडगेबाबांनी आपल्या कृतीशील कार्यातून समाजवादी विचारांची पेरणी केली-प्रसाद कुलकर्णी. -------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------- राज्यघटनेतील मुल्ये राज्यघटनेच्या निर्मीती पुर्वी गाडगेबाबां स्वतः किर्तनातून मांडत असत आणि ती मुल्ये ते आचरत ही असत. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी केले . ते वनश्री मोफत रोपवाटिका मुरगूड च्या वतिने आयोजित "निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या १४७ व्या जयंती " कार्यक्रम प्रसंगी बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार हे होते. तर गहीनीनाथ समाचारचे संपादक सम्राट सणगर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, बिद्रीचे संचालक दत्तामामा खराडे, जय शिवराय एज्यु. संस्थेचे कार्यवाह आण्णासो थोरवत बहुजन जनजागृतीचे संस्थापक एम टी सामंत, माजी नगरसेवक सुहास खराडे , किरण गवाणकर, सिकंदर जमादार

दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पूर्ली येथे संपन्न झाला इयत्ता दहावीचा सदिच्छा समारंभ.

Image
 दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पूर्ली येथे संपन्न झाला इयत्ता दहावीचा सदिच्छा समारंभ. ---------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------- दिवसमागून दिवस सरले अनेक वर्षे सहज सरलीत दिवस उजाडला निरोपाचा आता सारे काही आठवणीतच उरले, बांधुनी घेऊ जगलेले क्षण सारे गोड मनाशी गाठू सारे  उत्तुंग यश शिखरे झेप घेउनी आकाशी. अशा अनेक भाव भावनांनी आज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचा निरोप घेतला. अध्यक्ष स्थानी शाळेच्या प्राचार्या सौ. मिरा राऊत मॅडम उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना सदिच्छा देताना दहावी सेमी चे वर्गशिक्षक श्री पाटील सर म्हणाले एखादा शिक्षक कडक शिस्तीचा असतो तो कधीच विद्यार्थ्यांचा प्रिय नसतो पण भविष्यात जे विद्यार्थी यशस्वी होतात त्या वेळी मात्र तेच शिक्षक विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आठवतात शिस्तप्रिय विद्यार्थी घडविण्याचे काम सर्व शिक्षक काम करत असतात असे त्यांनी सांगितले तर दहावी इंग्रजी माध्यमाचे वर्ग शिक्षक  विजय कांबळे सर यांनी अकरावी आणि बारावी हि दोन वर्षे तुमच

शिरोळ तहसील कार्यालयासह पोलीस अधिकाऱ्यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन.

Image
 शिरोळ तहसील कार्यालयासह पोलीस अधिकाऱ्यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन. ------------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र जयसिंगपुर/प्रतिनिधी राहुल कांबळे ------------------------------------------ कणेरीमठ येथे सुरू असलेल्या सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव  सोहळ्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या कोल्हापूर येथील इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी भूषण पाटील यांना धक्काबुक्की व मारहाण झाल्याने  संबंधित दोषीवर तात्काळ कारवाई करावी.या प्रमुख मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील सर्व पत्रकाराच्या वतीने शिरोळ तहसील व शिरोळ पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांना शनिवारी निवेदन देण्यात आले.  दरम्यान,तालुक्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाच्या वतीने शिरोळ येथे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दत्तात्रय बोरीगिड्डे व तहसील कार्यालयाचे अवल कारकून नासिर कोठीवाले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार सुरेश कांबळे, दगडू माने, रमेश सुतार यांनी मनोगतात तीव्र भावना व्यक्त करून पत्रकारावरील हल्ल्याचा निषेध नोंदवला.या आंदोलनामध्ये ज्येष्ठ पत्रकार आनंदा शिंगे, चंद्रकांत भाट , सुरेश कांबळे ,दगडू माने,डी आर पाटील, सत

आमदार फंडातून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटला तडा.

Image
 आमदार फंडातून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटला तडा. --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे --------------------------- राधानगरी अभयारण्यात क्षेत्रा मध्ये येत असलेल्या मांजर खिंड येते आमदार फंडातून कोठावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे निष्कृष्ट दर्जाचे काम केल्याने त्याला तडा गेला असल्याने त्या कामाची चौकशी करण्यात यावी  अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील सांगावकर यांनी केले आह राधानगरी अभयारण्य क्षेत्रामध्ये मांजरखंड येते आमदार फंडातून बांधण्यात आलेल्या या सेल्फी पॉईंट चे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री उदय सामंत येणार असल्याने त्या सेल्फी पॉइंट चे काम दोन दिवसात पुरा करून घाईगडबडीने उद्घाटन आमदार यांनी करून मोठेपणा मिळवला पण सेल्फी पॉइंट काम एक वर्षाच्या आत काम प्रत्यक्ष पाहणीतून दिसूनआले आहे  कामाचे चौकशी करण्यात यावी अशी मागणी पर्यटकांकडून व सामाजिक कार्यकर्ते सुनील सांगावकर यांनी केले आहे

जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाने सराईत चोरट्यास 3 लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालासह घेतले ताब्यात.

Image
 जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाने सराईत चोरट्यास 3 लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालासह घेतले ताब्यात. ------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र जयसिंगपुर/प्रतिनिधी राहुल कांबळे --------------------------------------------- जयसिंगपूर शहरा लगतच   असणाऱ्या संभाजीपूर येथून दारात उभी केलेली  ह्युंडई आय 20 कार अज्ञात चोरट्याने बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी सायंकाळी सव्वा सात च्या सुमारास चोरून नेले असलेची फिर्याद विराजित अशोक अंदरघिसके व.व.23 यांनी जयसिंपूर पोलीसांत दिली होती.याबाबत मिळालेली माहिती अशी की यातील फिर्यादी यांनी आपला लॅपटॉप घरात ठेवण्यासाठी चारचाकी गाडीची किल्ली गाडीलाच लावून घरात गेले होते. घरात लॅपटॉप ठेवून परत आले असता दारात उभी केलेली 3 लाख रुपये किंमतीची आय 20 गाडी काही क्षणात कोणीतरी  चोरून नेली असलेचे निदर्शनास येताच सदर घटनेची माहिती फिर्यादीने जयसिंपूर पोलिसांना दिली.यावेळी सोशल मिडियावर गाडीचा फोटो आणि माहिती व्हायरल करण्यात आली. त्याअनुषंगाने पोलिस पेट्रोलिंग करत असताना   उमळवाड येथील सतीश रामा हेगडे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे माहिती प्राप्त

अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे : फडके.

Image
 अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे : फडके. ------------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------------- मिरज : अपंगांच्या अनंत अडचणी सोडवण्यासाठी त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी तरुणांनी सक्रिय झाले पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र फडके यांनी व्यक्त केले. ते  शासकीय अपंग शाळा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल अपंग कल्याण  कायदेविषयक प्रशिक्षण उपक्रमात  प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.   प्रमुख अतिथी  ॲड फारूक कोतवाल  यांनी समाज कल्याण विभाग अंतर्गत शासनाचे विविध योजनेची माहिती दिली.  गाव, शहर स्तरावर जनजागृती करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून  कार्य सुरु आहे‌.  असे सांगितले. अध्यक्षस्थानी सदाशिव मगदूम होते.  यांनी आपल्या सामाजिक संवेदना जिवंत ठेऊन अपंगांच्या हक्कासाठी   सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अपंगाना न्याय मिळवून देण्याचे काम करूया असे आवाह

पीडित तक्रारदार मुलीची तातडीने दखल-अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची तत्परता.

Image
पीडित तक्रारदार मुलीची तातडीने दखल-अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची तत्परता. -------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------- सांगली : विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे दक्षता समिती व शांतता समितीच्या बैठकीमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन केले व ओळखपत्र ,परिसरातील चोऱ्या, चेन स्नेचिंग, चोरीचे मुद्देमाल परत करण्याची प्रक्रिया, समितीच्या सदस्यांची जबाबदारी व कर्तव्य आदी विषयावर चर्चा केली. . तसेच समितीच्या बैठकीदरम्यान पीडित तक्रारदार मुलीची तातडीने दखल घेऊन कार्यवाहीचे आदेश दिले. दलाल यांच्या  कार्यपद्धती व तत्परतेबद्दल सदस्यांनी अभिनंदन करून आभार मानले. मीटिंग चे स्वागत व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले. याप्रसंगी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, डॉ. संजय पाटील, शहाजी भोसले, शेवंता वाघमारे, संगीता शिंदे, प्रा. तोहीद शेख, छाया सर्वदे, अनिल शेटे, उत्तम कांबळे, राजेश साळुंखे, माधव घोरपडे उपस्थित होते. आभार कॉन्स्टेबल संजय मोटे य

महाड-वाकी, गावठण येथे सोमेश्वर महादेव मंदिरा मध्ये महाशिवरात्री महोत्सव भक्तिभावाने साजरा.

Image
 महाड-वाकी, गावठण येथे सोमेश्वर महादेव मंदिरा मध्ये महाशिवरात्री महोत्सव भक्तिभावाने साजरा. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मुंबई प्रतिनीधी  महेश कदम ----------------------------------- सदगुंरुच्या आदेशाने व गुरुतत्वसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर महादेव मंदिर, ता. महाड-जि. रायगड, वाकी बु. गावठण येथे महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने महाअभिषेक महाप्रसाद,अन्नदान करण्यात आले व दिवस भर सेवेची तयारी करुन शिवपिडींवर महाअभिषेक व महादेवाला त्यांच्या आवडीची बेलपत्र वाहुन शिवपुजन करण्यात आले. होम हवन तसेच श्री.शिवलीला अमृत कथासार 11 वा अध्यायाचे वाचन श्री. क्षेत्र गावठण महिला व मुलींचा हरिपाठ, हळदीकुंकू सभारंभ करण्यातआले, रात्री भैरवनाथ महीला भजन मंडळ कुंभारवाडा (बिरवाडी) गायिका  सौ.अमृता ताई पवार. यांचे सुंदर भजन झाले तसेच महाशिवरात्री महोत्सवला वाकी पंचक्रोशीतील नामवंत व्यक्ती व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावठण ग्रामस्थ तसेच गावठण महिला मंडळ, नवतरुण क्रिडा मंडळ, गावठण मुंबई मंडळ यांनी सोमेश्वर महाशिवरात्री निमित्त खुप मोलाचे सहकार्य केले.

रुग्ण सलाईन वर, नातेवाईक रस्त्यावर,; धक्कादायक वास्तव.

Image
 रुग्ण सलाईन वर, नातेवाईक रस्त्यावर,; धक्कादायक वास्तव. -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र पुंडलिकराव देशमुख अमरावती विशेष प्रतिनिधी -------------------------------------- जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात रुग्णालयाचे मुख्य त्यांचे गेट अर्धे लावलेले शेजारी सुरक्षा रक्षक बसलेले होते रात्री बाराची वेळ होती गेटच्या आत मध्ये रात्री ९ नंतर कुठल्याच पुरुषाला प्रवेश नसल्याने आता भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरच थांबावा लागते आत असलेल्या रुग्णासोबत एका महिलेला थांबण्याची परवानगी आहे त्यामुळे सोबत असलेले पुरुष मुख्य इमारती समोरच असलेल्या टिनाचे शेड असलेल्या खुल्या जागेवर झोपलेले रुग्णांचे नातेवाईक काही मुख्य द्वाराच्या बाजूला झोपलेले नातेवाईक बाहेर गावावरून प्रसूती करता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय दिवसा आणि रात्रीही थांबण्याच्या जेवणासाठी च्या सुविधा अपुऱ्या त्यामुळे नातेवाईकांची गरज होत असल्याचे दैनिक सुपर भारत ने प्रत्यक्ष जाऊन केलेल्या पाहणीत आढळले सोबतच पार्किंग परिसरात अनेक जण संशयस्पद स्थितीत फिरताना आढळून आले त्याला

आम . देवराव होळींच्या उपस्थितीत गडचिरोली पं .स ची आमसभा वादळी.

Image
 आम . देवराव होळींच्या  उपस्थितीत गडचिरोली पं .स ची आमसभा वादळी.  ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  गडचिरोली / प्रतिनिधी ----------------------------------- 👉 संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावण्यांचा  आयोजक आणि राजकारण्यांना विसर?  👉 मुकुंदराव उंदिरवाडे  यांनी लक्षात आणून दिली चुक.  गडचिरोली पंचायत समितीची वार्षीक आमसभा आमदार डॉ . देवराव होळी यांच्या अध्यक्षते खाली पार पडली . सदर सभेला आमदार होळी, बिडिओ साळवे ' माजी सभापती मारोतराव ईचोळकर, माजी उपसभापती विलास दशमुखे, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे तसेच विविध खाते प्रमुख, कर्मचारी , बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .आमदार होळी यांचे आगमन होताच पुलखल च्या महिलांनी  ग्रामसेवक फुलझेले यांना हटवा या मागणी साठी आमदारांना घेराव घातला. तेव्हा आमदार महाशयाने मुख्य कार्यपालन अधिकारी. जि . प . गडचिरोली यांना तातडीने फोन करून प्रकरण तात्पुरते शांत केले . सभेला लोकशाही - संविधान या विषयावर चर्चा सुरु असतांना सभेच्या ठिकाणी संत गाडगेबाबा , संत तुकडोजी महाराज या दोनच महापुरुषाचे फोटो लावण्यात आले होते .

जयसिंगपूर मधून तिसरा डोळा गायबभुरटे चोर पकडण्यास जयसिंगपूर पोलिस हतबल.

Image
 जयसिंगपूर मधून तिसरा डोळा गायब भुरटे चोर पकडण्यास जयसिंगपूर पोलिस हतबल. ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र जयसिंगपूर/प्रतिनिधी   राहुल कांबळे ------------------------------------- काही दिवसांपासून जयसिंगपूर मध्ये भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे.मागील आठवड्यात दोन महिलेच्या बाबतीत  हिसडा मारून सोने लंपास केलेली घटना घडली आहे.पण अद्याप भुरट्या चोराचा काही पत्ता जयसिंगपूर पोलिस ठाण्याला लागत नाही मग जयसिंगपूर पोलिस ठाणे चोराचा शोध घेण्याऐवजी नेमकं कश्यात मग्न आहेत याची वरिष्ठांनी चौकशी करण्याची सध्या गरज आहे. जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक यांनी जयसिंगपूर मध्ये पदभार स्वीकारून तेवीस दिवस झाले.तर या तेवीस दिवसात जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल संख्या कमी झाली आहे.याबाबत जयसिंगपूर शहरातील काही नागरिक मात्र आनंदित आहे पण काही नागरिकांच्या मनात मात्र नाराजगी दिसून येत आहे.पोलिस ठाण्यात आता न्यायालय सुरू केलेल्यांची चर्चा नगिरिकातून होताना दिसत आहे..  जयसिंगपूर शहरात लोकवर्गणीतून काही ठराविक ठिकाणी सी.सी.टी.वी बसवण्यात आले होते व त्याचे थेट चित

कोल्हापुरच्या उत्पादनाला जागतिक नकाशावर आणण्यासाठी सहकार्य.

Image
 कोल्हापुरच्या उत्पादनाला जागतिक नकाशावर आणण्यासाठी सहकार्य. -------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------ शिरोली   : कोल्हापूरच्या उत्पादनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे मत अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाचे आंतरराष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी रॉब अँडरसन यांनी व्यक्त केले. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( स्मॅक ) च्या स्वच्छ तंत्रज्ञान आणि ऊर्जा कार्यक्षमता प्रणाली या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. स्मॅकचे अध्यक्ष दिपक पाटील हे अध्यक्षस्थानी होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अनिल वेल्दे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, अमेरिकन दुतावासाच्या सार्वजनिक सहभाग विशेषज्ञ अमृता डिमेल्लो, स्मॅक उपाध्यक्ष एम. वाय. पाटील, स्किल ट्रेड प्रमोशन समितीचे अमर जाधव हे प्रमुख उपस्थितीत होते. श्री. अँडरसन यांनी, अमेरिकन दूतावासा कडून एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच फाऊंड्रीमधील ऊर्

स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पाटणे फाटा येथे चक्काजाम आंदोलन.

Image
 स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पाटणे फाटा येथे चक्काजाम आंदोलन. ------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------- चंदगड : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पाटणे फाटा येथे मंगळवारी (दि.२२ फेब्रुवारी २०२३ रोजी) चक्काजाम आंदोलन झाले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना पन्नास हजार कर्ज माफीचे हप्ते वाढीव वीजदर मिळावे, शेतीपंपाचे वाढीव प्रस्तावित, ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी लूट, कापूस थकीत, ऊसाची एफआरपी, मका पीकविमा, अतिवृष्टीची भरपाई तसेच प्रोत्साहन पर अनुरानाची थकीत रक्कम आदी प्रश्नासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी चंदगड पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पोलिस संरक्षण देण्यात आले होते. रास्तारोको आंदोलन केले त्यानंतर प्रा. दिपक पाटील व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.दिपक पाटील यांच्यासह विश्वनाथ पाटील, गजानन राजगोळकर, बी.एम.पाटील, के.

जाऊ संतांच्या गावा.

Image
 जाऊ संतांच्या गावा. -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र बार्शी तालुका प्रतिनिधी  जोतीराम कुंभार -------------------------------------- आज एका अशा महाराजांची जयंती आहे की, ते नियतीला पडलेलं कोडं ठराव! कारण ते महाराज कीर्तनकार होते. पण ते "देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका असं सांगायचे, शिकलेले नव्हते. मात्र, शिक्षणाचे महत्त्व आपल्या किर्तनातून सांगताना अडाणी राहू नका, असा संदेश द्यायचे. सावकाराचे कर्ज काढू नका असं म्हणत आर्थिक बाबतीत सजग राहण्याचे ज्ञान द्यायचे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वत: गावाची स्वच्छता करायचे... अशा संत गाडगे महाराजांची आज जयंती."बाप हो,,,,, पैसे नसेल तर जेवणाचे ताठ मोडा, हातावर भाकरी खा, बायकोले लुगडे कमी भावाचे घ्या, पण मुलाले शाळेत घातल्या शिवाय राहू नका,"असा संदेश देणारे संत गाडगे बाबा! डोक्यावर झिंज्या, त्यावर खपराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके, असा पेहराव असणारा संत समाजाला उपदेश करत राहिला, संत कबीर आणि संत रोहिदास यांच्या विचारां

जयसिंगपूर येथील चौधरी हॉस्पिटल मध्ये उपचाराच्या नावाखाली हाजोरो रुपयांची लूट.

Image
 जयसिंगपूर येथील चौधरी हॉस्पिटल मध्ये उपचाराच्या नावाखाली हाजोरो रुपयांची  लूट. ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र जयसिंगपुर/प्रतिनिधी  राहुल कांबळे ------------------------------------- डॉक्टर म्हणजे देवाचे मानले जाणारे दुसरे रूप पण हल्ली या देवाच्या रूपाने कोण सावकार जन्म घेत असलेले दिसत आहेत.    जयसिंगपूर मधील गल्ली नंबर अकरा येथे लहान मुलांच्या उपचार करण्याकरिता चौधरी हॉस्पिटल आहे पण त्या दवाखान्यात लहान मुलांचे उपचार करण्या ऐवजी त्यांच्याकडून पैसे कसे उकळता येईल आणि आपली खळगी कशी भरेल याचाच विचार केला जात असल्याची चर्चा सध्या जयसिंगपूर आणि आजूबाजच्या गावामध्ये जोरात धुमाकूळ घालत आहे. मेडिकल असोसिएशन जयसिंगपूर व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी महाराष्ट्र मधील प्रत्येक दवाखान्यांमध्ये एक दर फलक लावण्याकरिता कल्पना देण्यात आले होते जेणे करून दवाखान्यात येण्यापूर्वी प्रत्येक रुग्णाच्या नातेवाइकांना पैशाची मांडणी करता यावी तसेच रुग्ण दवाखान्यात उपचार घेण्यापूर्वी किव्हा रुग्ण दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी सदर रुग्णाच्या नातेवाइकांना बिलाची पूर्व कल्पना देवू

सातारा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे थेट सोडत संपन्न.

Image
 सातारा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे थेट सोडत संपन्न. ----------------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------------- सातारा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे वतीने ‌सन २०२२/२३ करिता आत सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे  व्यवस्थापक राजीव चव्हाण,‌ समाजकल्याण विभागाचे कोकरे, पुणे ‌ समाजकल्याण विभागाचे किरण संकट, जयवंत वायदंडे यांच्या उपस्थितीत थेट कर्ज वाटप सोडत काढण्यात आली.सदर योजनेसाठी एकुण १२६ अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यातून ‌३७ अर्ज महिला व८९ अर्ज पुरूष  या मधूनच पन्नास टक्के महिला व पन्नास टक्के पुरुष असे ३२ महिला व ३३ पुरूष अर्ज सोडत काढण्यात आली. सदर प्रसंगी लाभार्थी व पत्रकार , अधिकारी हजर होते. संपुर्ण प्रकिया पारदर्शकता यावी म्हणून ‌विडीओ‌ शुटिंग करणेत आले. पारदर्शक प्रकिया राबविण्यात आल्याने लाभार्थी यांनी शासनास धन्यवाद दिले.