धानोली ग्रामपंचायतीने मिळविले आयएसओ मानांकन.

 धानोली ग्रामपंचायतीने मिळविले आयएसओ मानांकन.

------------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी                                                                                         

मंगेश तिखट

---------------------------------------------------------

कोरपना - तालुक्यातील माणिकगड पहाडालगत नक्षलग्रस्त डोंगराळ व दुर्गम भागात असलेल्या धानोली ( तांडा ) ग्राम पंचायतीने आय एस ओ नामांकन पटकाविले पटकाविले आहे. हा बहुमान पटकाविणाऱ्या तालुक्यातील चौदावी तसेच नवीन आर्थिक वर्षातील पहिली  ग्राम पंचायत ठरली आहे.

यापूर्वी या ग्राम पंचायतीला अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. धानोली ही अतिदुर्गम भागातील विकसनशील ग्राम पंचायत असून येथे वर्षभर बरेच लोक उपयोगी उपक्रम राबविले जातात. १८ जानेवारी रोजी  ग्राम पंचायत धानोली  येथे आय एस ओ नामांकन सोहळा पार पडला . त्यात ग्राम पंचायतीला गौरविण्यात आले. याप्रसंगी धानोली ग्राम पंचायत सरपंच वैशाली पेंदोर, उपसरपंच ओमराज पवार , सदस्य वंदना मडावी, कविता जाधव , सुदर्षण आडे, गंगाधर राठोड, सीमा कोटणाके, यादव किंनाके, ज्योतिका गेडाम , सुमन मंगाम ग्रामसेवक गरणुले आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले.तालुक्यातील इतर ग्राम पंचायतीने धानोली ग्राम पंचायत चा आदर्श घ्यावा. तसेच गाव विकासासाठी कार्य करावे असे उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.