उंचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीलगत देशी दारूच्या दुकानास परवानगी देण्यात येवू नये.

 उंचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीलगत देशी दारूच्या दुकानास परवानगी देण्यात येवू नये.

-------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------

उचगांव गाव हे ५० हजार लोकसंख्येचे गाव असून गावाचा मोठा विस्तार असून गावाच्या मुख्य प्रवेशव्दार समोर चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची चबुतऱ्यावर मुर्ती प्रतिष्ठापणा केली असून संपूर्ण गावामध्ये ही छत्रपती शिवाजी महाराजांची ही एकमेव मुर्ती असुन अगदी मुर्तीलगत ५ ते १० फुटावर प्रशासन देशी दारूचे दुकानास परवानगी देत असून ही बाब संपुर्ण उचगांववाशीयांना खटकली आहे. तसेच संपुर्ण १० ते १५ हजार लोकसंख्येच्या माळभागाला गावच्या प्रवेशव्दाराकडे येण्यासाठी हा एकच मार्ग असून तोही अगदी अरूंद आहे. महिलांना भाजी खरेदीसाठी असो अन्य कोणतीही खरेदी करण्यासाठी व येजा करण्यासाठी तसेच लहान मुले, विद्यार्थी वयोवृधांना येजा करण्यासाठी चा तो एकमेव मार्ग असून प्रशासन जर त्या रस्त्यावर देशी दारू दुकानास परवानगी देत असेल तर त्यासारखी कोणतीही लाजीरवानी गोष्ट नाही. तसेच महाराजांच्या मुर्ती लगत गणेश मंदिर असून गावातील महिला संकष्टी दिवशी व दररोज सकाळ संध्याकाळ दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची मंदिरात गर्दी असते माळभागातील लोकांना येजा करण्यात येणाऱ्या मार्गावर जर प्रशासनाने देशी दारू दुकान सुरू करण्यास परवानगी दिली तर छत्रपती शिवाजी महाराज व श्री गणेश मंदिर, यासह महिलांच्या सुरक्षितेचा मोठा प्रश्न निर्माण होईल व कायदा सुव्यवस्था बिघडणेची दाट शक्यता असून आपण त्या दुकानास परवानगी देवू नये अन्यथा आम्हास उचगांवातील जनतेला घेवून आपल्या खात्या विरोधात तिवृ अंदोलन करावे लागेल व होणाऱ्या परिणामास आपले खाते जबाबदार असेल.

या मागणीचे निवेदन करवीर शिवसेना व उंचगाव मधील समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने मा. रवींद्र आवळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर यांना देण्यात आले. यावेळी अधीक्षक रवींद्र आवळे म्हणाले की आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना पाठवून आपल्या निवेदनाचा विचार करू व स्वतः जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून योग्य ती कार्यवाही करू. असे आश्वासन अधीक्षकांनी शिष्टमंडळाला दिले.

 यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचा विचार झाला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, भारतीय मानवाधिकार जिल्हाध्यक्ष वसंतराव मोरे, मा. उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, शिवप्रतिष्ठानचे विजय गुळवे, फेरीवाले संघटनेचे तालुका अध्यक्ष कैलास जाधव, युवासेनेचे सागर पाटील, योगेश लोहार,  शिवप्रतिष्ठानचे शरद माळी, उंचगाव गावप्रमुख दीपक रेडेकर, ग्रा. पं. सदस्य विराग करी, महेश खांडेकर, अमर कदम, बंडा पाटील, दिग्विजय माळी आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.