सांगवडे गावात आक्काताई कांबळे यांचे घरी व त्यांच्याच गल्लीत अस्सल विषारी घोणस जातीचे साप आढळले.

सांगवडे गावात आक्काताई कांबळे यांचे घरी व त्यांच्याच गल्लीत अस्सल विषारी घोणस जातीचे साप आढळले. 

-----------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------

सांगवडे ÷आक्काताई कांबळे व त्यांचा परिवार दोन दिवस वाढदिवसानिमित्त गावी गेले होते. ते संध्याकाळी परत आल्यानंतर त्यांची सुन हात पाय धुण्यासाठी पाणी घेत असता त्यांना जेवण खोलीत जळणा मध्ये साप असल्याचे जाणवले. व त्यांनी लगेच आसपासच्या शेजाऱ्यांना मदतीस बोलवलं. लगेच करण ढाले व गौरव कुंभार यांनी सर्पमित्र वैभवराज चिपरे व युवराज जाधव यांना फोन करून बोलवून घेतले. सर्पमित्र तात्काळ आक्काताई कांबळे यांच्या घरी येऊन घोणस जातीचा सर्प पकडला व त्या विषारी सर्पाला त्याच्या सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले व अनुचित प्रसंग टाळला. तसेच लगेच दोन दिवसानंतर त्याच गल्लीमध्ये परत घोणस जातीचाच साप गल्लीमध्ये आढळून आला तोही सर्प सर्पमित्रांनी तात्काळ पकडून नेऊन सोडला.

    सर्पमित्र वैभवराज चिपरे व युवराज जाधव यांच्या मदतीस सर्प पकडण्यास बापू पायमले, आकाश जाधव, करण ढाले, विशाल कांबळे महेश ढाले, अनिकेत चांदणे हे होते.

   कोणाच्या घरी सर्प आढळल्यास या नंबर वर संपर्क साधा.... 

 सर्पमित्र 

वैभवराज चिपरे

mo-9011203972

 युवराज जाधव mo-7066202283 

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.