जिल्हा न्यायालयात युवा दिन संपन्न...विवेकानंदांच्या साहित्यात युवा पिढी घडवण्याचे सामर्थ्य : फडके.
जिल्हा न्यायालयात युवा दिन संपन्न...विवेकानंदांच्या साहित्यात युवा पिढी घडवण्याचे सामर्थ्य : फडके.
--------------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राजू कदम
कुपवाड ग्रामीण
--------------------------------------------------------------------------
मिरज : स्वामी विवेकानंदांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये तरुण पिढी घडवण्याची शक्ती आहे असे मत प्रा. डॉ.रवींद्र फडके यांनी मांडले. ते जिल्हा न्यायालयातील युवा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती पी. के. नरदेले होते. यावेळी न्यायमूर्ती व्हीं.एफ. चौगुले व न्यायमूर्ती श्रीमती. एस. बी. केस्तिकर-नलगे व गौतम प्रज्ञासूर्य उपस्थित होते.
प्रा. रवींद्र फडके पुढे म्हणाले की वयाच्या विसाव्या वर्षी विवेकानंदांचे चरित्र वाचले व तरुण वयातच सामाजिक कार्याकडे ओढा वाढला.
सर्व धर्माचा अभ्यास करण्याची प्रेरणा विवेकानंदांच्या चरित्रातून मिळाली. इस्लाम धर्मातील जकात मधून दिले जाणारे दान लक्षात घेता मिळकतीतील मोठा वाटा गोरगरिबांसाठी देण्याचा निश्चय वयाच्या विसाव्या वर्षीच केला व जीवनाला कलाटणी मिळाली असे अनुभवाचे बोल फडके यानी मांडले. स्वागत व सूत्रसंचालन नितीन आंबेकर यांनी केले व आभार सचिन नागणे यांनी मानले.
Comments
Post a Comment