पुणे बंगळूर महामार्गावर मोटारीने दुचाकीस धडक दिली एकजण ठार एकजण जखमी.

 पुणे बंगळूर महामार्गावर मोटारीने दुचाकीस धडक दिली एकजण ठार एकजण जखमी.

--------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

गांधीनगर, ता.१७ः पुणे बंगळूर महामार्गावर उचगाव (ता. करवीर) येथील इंडियन ऑईल पेट्रोलपंपासमोर सकाळी ६ च्या सुमारास मोटारीने मोपेडला मागून धडक दिल्याने बाजीराव ज्ञानू पाटील (वय ४२, मूळ गाव तेलवे, ता. पन्हाळा, सध्या रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) हा जागीच ठार झाला तर अभिजीत गजानन बकरे (वय २८, रा. श्रीराम कॉलनी, श्रीराम मंदिरजवळ, उजळाईवाडी, ता. करवीर) हा गंभीर जखमी झाला. अपघातातील मोटार चालक मोटार सोडून पळून गेला.

याबाबतची माहिती अशी की, सकाळी सहाच्या सुमारास बाजीराव पाटील आणि अभिजीत बकरे हे मोपेड क्रमांक एम एच ०९ ए व्ही १२९४ वरुन मार्केट यार्डकडे जात होते. यावेळी पुणे बंगळूर महामार्गावर उचगाव हद्दीतील इंडियन ऑईल पेट्रोलपंपासमोर ते आले असता मागून येणाऱ्या मोटार क्रमांक एम एच १२ टी व्ही ३९५८ ने जोराची धडक दिली. या धडकेमध्ये बाजीराव पाटील हे डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाले तर मोपेडवर मागे बसलेला अभिजीत बकरे हा गंभीर जखमी झाला. यानंतर मोटारचालक मोटार जागीच सोडून पळून गेला. बाजीराव पाटील हा मार्केट यार्डमध्ये एका खासगी दुकानात दिवाणजीचे काम करत होता. त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुली असल्याचे समजते. जखमी अभिजीत बकरे यांनी याबाबत पोलीसांत फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार सुभाष सुदर्शनी करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.