पत्नीचा खून करून केला अपघाताचा बनाव !
पत्नीचा खून करून केला अपघाताचा बनाव !
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुलगा व्हावा यासाठी झालेल्या वादातून शनिवारी पहाटे पतीने रुमालच्या साहाय्याने गळा आवळून पत्नीचा खून केला. अश्विनी एकनाथ पाटील (वय २८) असे ठार झालेल्या पत्नीचे नाव आहे. ही घटना करवीर तालुक्यातील दोनवडे येथे घडल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले. पत्नीच्या खून प्रकरणी पोलिसांनी पती एकनाथ पाटील (वय ३५) याला ताब्यात घेतले आहे.
अश्विनीच्या माहेरच्या नातेवाईकांनी अश्विनीचा पती एकनाथ यांनीच खून केल्याची तक्रार दिल्याने करवीर पोलिसांनी एकनाथची कसून चौकशी केली. एकनाथ अश्विनीच्या रुमालच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याचे कबूल केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की अश्विनी आणि एकनाथ पाटील या दोघांना दोन मुली आहेत. आपल्याला मुलगा व्हावा यासाठी पतीचा आग्रह होता. त्यातून या दाम्पत्यमध्ये वाद सुरु होता. पतीकडून अश्विनीचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता, असे करवीरचे पोलिस उपनिरीक्षक निवास पवार यांनी सांगितले. पत्नीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे पती एकनाथ पाटील याने पोलिसांना सांगितले होते; सीपीआर मधील मेडिकल ऑफिसर डॉक्टर अनिकेत पाटील यांना महिलेच्या गळ्याभोवती काळे ठसे आढळल्याने त्यांनी खून झाला असल्याचे सांगितले त्या अनुषंगाने करवीर पोलिसांनी केलेल्या चौकशीत पतीचा हा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी पती एकनाथ पाटील याला ताब्यात घेतले आहे.
Comments
Post a Comment