कुपवाड वार्ड क्र.१ कापसे प्लॉट मध्ये जनसेवेचा कोण नगरसेवक आहेत का?
कुपवाड वार्ड क्र.१ कापसे प्लॉट मध्ये जनसेवेचा कोण नगरसेवक आहेत का?
-------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
कुपवाड : कुपवाड कापसे प्लॉट वार्ड क्र.१ महासम्राट चौक मध्ये ना गटारी ना रस्ते नुसता आश्वासन आज करतो उद्या करतो!
कुठे आहे विकास पलीकडच्या गल्लीत या गल्लीत का विकास नाही का मतदार कमी आहेत म्हणून, मतदान झाल्यापासून एकही नगरसेवक या आमच्या भागात फिरकला नाही.या भागातील नागरिकांचा चारही नगरसेवकांच्यावर हल्लाबोल कुठे आहे विकास आमच्याकडे दाखवा जी अर्धवट एक गटार आहे ती पण कोण काढायला येत नाही तुडुंब भरून नागरिकांच्या घरात गटारीचे पाणी तुडुंब भरलेल्या गटारीच्या पाण्यामुळे लहान मुले आजारी पडत आहेत.
डेंगू सारख्या रोगांला निमंत्रण देत आहे. रस्ता तर काय बघायलाच नको रस्त्याला खड्डा पडलाय का खड्डा रस्त्यात आहे ते पण कळत नाही!! या भागात नागरिकांना फिरने सुद्धा मुश्किल झाले आहे. पाऊस पडला की नागरिकांच्या घरात पाणी या भागात तलावाचे स्वरूपच येते. तुम्हाला मतदान करून आमची चूक झाली वाटतं.
येणाऱ्या काही दिवसात आमच्या भागातील कामे मार्गी नाही लागली तर महापालिकेत ठिय्या आंदोलन करू असा इशारा या भागातील नागरिकांनी आमच्या फ्रंटलाईन न्यूज शी बोलताना दिला.
Comments
Post a Comment