फुलेवाडीमधील तरुणाचा निघृण खून..पाचगाव मधील जगताप नगर येथील ज्योतिर्लिंग शाळेच्या पाठीमागे सापडला मृतदेह....

  फुलेवाडीमधील तरुणाचा निघृण खून..पाचगाव मधील जगताप नगर येथील  ज्योतिर्लिंग शाळेच्या पाठीमागे सापडला मृतदेह..

-----------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------------
करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहरा नजीक असणाऱ्या फुलेवाडीतील  ऋषिकेश महादेव सूर्यवंशी या पंचवीस वर्षे युवकाचा पाचगाव येथील जगताप नगर शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या ओढ्यालगत रिकाम्या जागेत छीन्ह विच्छिन्न अवस्थेत महादेव सुर्यवंशी या युवकांचा मृतदेह आढळून आला. हा खून मंगळवारी रात्री झाला असल्याची शक्यता वर्तवली जात असून धारदार शस्त्राने वार करून डोक्यात दगड घातल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.  या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई,  करवीर चे डीवायएसपी संकेत गोसावी,  यांच्यासह विविध खात्याचे पोलीस अधिकारी , यांनी घटनास्थळी धाव घेतली.खुनाचे नेमके कारण मात्र अजूनही समजू शकलेले नाही.घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सीपीआर मध्ये सर्व विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पोलिसांनी यंत्रणा गतिमान केले असून लवकरच आरोपी पर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येईल असं सांगण्यात येत आहे. या घटनेने कोल्हापूर सह परिसरात मात्र खळबळ उडाली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.