मा. राजेश चौगुले फाउंडेशन मार्फत अंकलखोप ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात साजरा..
-----------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व अंकलेश्वर उद्योगसमूह ,क्लेरमाँन्ट
इंटरनॅशनल स्कूल, आष्टा व अंकलखोप स्कूलचे संस्थापक मा. श्री. राजेश चौगुले सर यांनी भूषविले व त्यांनी लोकनियुक्त सरपंच मा.सौ. राजेश्वरी शशिकांत सावंत यांचा सत्कार केला,तसेच उपसरपंच मा.सौ. रोहिणी राजेंद्र चौगुले यांचा सत्कार क्लेरमाँन्ट इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल मा. श्री. चंदनगौडा माळीपाटील सर यांनी केला.
अंकलेश्वर क्रेडिट सोसायटी अंकलखोपचे मा. श्री. रामगौंडा पाटील, संचालक श्री.सकळे सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .
या सत्कार सोहळ्यावेळी अध्यक्ष म्हणून लाभलेले मा. श्री. राजेश चौगुले यांनी गावच्या विकासाबाबत आपले मनोगत व्यक्त केले, तसेच सरपंच मा. सौ. राजेश्वरी पाटील यांनी देखील गावचा विकास करण्याची ग्वाही दिली.
अंकलखोप गावचे नवनिर्वाचित सदस्य श्री.अशोक निवृती सूर्यवंशी, श्री.कृष्णा लक्ष्मण हजारे ,सौ. सुरेखा संतोष कुराडे ,श्री .गुंडू उर्फ अशोक पांडुरंग चौगुले, सौ.संगीता सुनिल कोळी, श्री.नवनाथ पांडुरंग पाटील, श्री. अभिजीत अनिल पाटील,सौ. जयश्री रविंद्र सूर्यवंशी, श्री. ज्ञानदेव बाळासाहेब सूर्यवंशी, सौ.वनिता बाबुराव वारे, सौ. स्वाती वसंत मोटकट्टे, श्री. प्रविण प्रकाश विभुते, सौ. नंदिनी दत्तात्रय लांडगे, सौ. सुनिता प्रशांत कुंभोजकर या सर्वांचा सत्कार सोहळा अगदी उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी संस्थापक राजेश चौगुले, व्यवस्थापक व सूर्यगावचे सरपंच श्री. विकास सूर्यवंशी, श्री.राजेंद्र कुंभार सर, मुख्याध्यापक श्री. चंदनगौडा माळीपाटील, वाईस चेअरमन रघुनाथ गडदे, अवधूत कोकाटे सरपंच, उपसरपंच ,सदस्य, अंकलेश्वर ग्रुप समूहाचे संचालक ,सचिव व कर्मचारी तसेच ,क्लेरमाँन्ट.
इंटरनॅशनल स्कूलचे सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment