मानीकगड सिमेंट कं चा प्रताप आदीवासी स्मशान उद्वस्त करीत केला निर्माण रस्ता.

 मानीकगड सिमेंट कं चा प्रताप आदीवासी स्मशान उद्वस्त करीत केला निर्माण रस्ता.

---------------------------------------------------------------------------
 फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मंगेश तिखट     
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 
---------------------------------------------------------------------------
जिवती तालुक्यातील स्वतंत्र पूर्व काळापासून कुसुंबी नावाचे एक गाव आहे या गावात पूर्व काळापासून अनेक आदिवासींची मृतकांची शव दफन केली आहे   या ठिकाणी सर्वे नंबर एक मध्ये 40 गुंठे जमिनीवर   अधिकृत शमशान भूमी असताना नुकत्याच माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रतापाने पूर्वकाळातील वही वाटीच्या  रस्त्यावर अनाधिकृत खदानी खोदून आसापुर कुसुंबी नो कारी सुतार पत्रकानुसार ते 30 फुटाचा सरकारी रस्ता नकाशात असून सॅटॅलाइट छायाचित्रानुसार निस्तार पत्रकामध्ये नमूद आहे असे असताना कंपनीने सक्षम प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता रस्ता खोदून नाल्याच्या काठावरून नवीन रस्ता तयार करण्यात येत असून रस्त्यावरील समशान भूमी मध्ये दगडी मातीचे ढग रचले आहेत 1984 85 मध्ये रस्त्या अस्तित्वात असलेल्या सर्व चिन्ह नष्ट करण्यात आले असून नकाशाची दुरुस्ती न करता कंपनीने आपल्या सोयीकरिता नाल्याच्या काठावरून नवीन रस्ता तयार करण्याचा घाट घातला आहे तीव्र स्फोटक वेळी अवेळी केल्या जात असल्याने रस्त्यावर जाणाऱ्या वाटसरूंना कमालीचा त्रास सहन करावा लागतो कंपनी सर्व नियम धाब्यावर ठेवून नियमबाह्य अनाधिकृत रस्त्याच्या सीमा व रस्ता नष्ट करीत अधिवाशांची अवहेलना केल्याचा आरोप कुसुंबी येथील आदिवासी नागरिकांनी केला आहे सिमेंट कंपनीला देण्यात आलेल्या भूपृष्ठ अधिकार क्षेत्र व्यतिरिक्त अनेक ठिकाणी अविरत चुनखडी उत्खनन केल्या जात आहे तसेच खदानीवर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर एक बोगद्या खालून कापसाचे वाहन जनावरांचे चारा घेऊन वाहन जाऊ शकत नाही असा बोगदा तयार करून लोकांना अडथळा जाण्या येण्यास निर्माण केला आहे कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधानमंत्री सडक योजनेचे काम थांबवून नवीन रस्ता निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडू असा इशाराही आदिवासींनी दिला असून तात्काळ समशान भूमी परिसरातील कंपनीचे अतिक्रमण हटवण्यात यावे उपरोक्त शमशानभूमी भूपृष्ठ अधिकार कंपनीला देण्यात आला नसताना सुरू करण्यात आलेले नाल्याच्या काठावरील रस्त्याचे काम तात्काळ थांबवण्यात यावे व आदिवासींच्या दफन केलेल्या पूर्व समाधी वर माती व दगड रचून अवमान केल्याबद्दल  तहसीलदार जिवती व ठाणेदार पोलीस स्टेशन गडचांदूर यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे कंपनी ही नित्याने अनेक वादामध्ये लिप्त असून आदिवासींचे सर्रास शोषण करीत असताना महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.