कोरपना तालुक्यातील बालकाचा बळी घेणारा बिबटया अखेर पिंजऱ्यात जेर बंद.

 कोरपना तालुक्यातील बालकाचा बळी घेणारा बिबटया अखेर पिंजऱ्यात जेर बंद.

--------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
मंगेश तिखट
 चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 
--------------------------------------------------------------------

: वनसडी वन परीक्षेत्रात्  25 डिसेंबर 2022ला बेळगाव शिवारात जामगुडा येथील बालकाला बिबट्याने ठार केले होते .त्यामुळे बिबट्याची दहशद निर्माण झाली होती. वनविभागाला बिबट्याचा बंदोबस्त करणे हे आवाहन.मात्र वनविभागाच्या अथांग परिश्रमाने अखेर 3/1/2023 ला बिबट्याला पिंजऱ्यात जेर बंद करण्यात वणविभागाला यश आले.सदर मोहीम ही सहाय्य्क वन संरक्षण .पवार साहेब  त्याच्या मार्गदर्शनात तसेंच वन परीक्षेत्र अधिकारी वनसडी ए.आर.चौधरी मॅडम,वन परीक्षेत्र अधिकारी जीवती लंगडे साहेब आर.आर.युनिट कोठारी पथक  बंडू पेंदोर वनपाल ,पंडित मेकेवार वनरक्षक,सुनील नगारे वनरक्षक, तसेंच हंसराज दुर्गे चालक क्षेत्र सहाय्य्क वनसडी दिनेश आर.चामलवार क्षेत्र सहाय्यक  कोरपना एन. आर.धात्रक  महादेव जाधव वनरक्षक ,बोढे , वनरक्षक काकडे  वनरक्षक,कुद्रावर वनरक्षक टिप्पावार  वनरक्षक,यांनी  .पिपरडा गुडा कक्ष. क्र. 21 नाल्याच्या वरच्या बाजूला सुधाकर रतन राठोड याच्या शेता जवळ बिबट्याच्या बंदोबस्ता साठी वरिष्ठाच्या मार्गदर्शनात पिंजरा लावला त्या ठिकाणी पारख ठेवली .3 तारखेला रात्रीच्या वेळी  पिंजऱ्यातील ठेवलेले भक्ष खाण्यासाठी बिबट्या पिंजऱ्यात शिरला व जेर बंद झाला.सदर बिबट्याने एक बालक तीन बकऱ्या एक कुत्रा ला ठार केले.

          बिबट्याच्या जेर बंदी मोहिमेत क्षेत्र.सहाय्य्क गडचांदूर टोंगे साहेब क्षेत्र सहाय्य्क पारडी टेकाम साहेब , वनरक्शक्   पाचभाई मॅडम, तांदुरकर् मॅडम,ताकसांडे ,तांभूलेज, जेलेवार, तसेच वन मजूर सुरेश नन्नूरवार ,मनोहर कुडमेथे, शेख मजित,विजय राऊत,विठ्ठल दुर्गे,मारोती उरकुडे,सुरेश सोनटक्के या वन कर्मचाऱ्यांनी गेल्या आठ दिवसापासून परीक्षम घेतले नरभक्षक बिबट जेर बंद झाल्याने परिसरातिल् भीती नष्ट झाली असून  वन विभागाने जेर बंद बिबट्याची रवानगी चंद्रपूर येथे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.